शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एमसीसी विषयच बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: December 9, 2014 23:17 IST

शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : फाटके ड्रेस, उसवलेल्या बुटांमध्ये नाईलाजास्तव प्रशिक्षण

मुरगूड : शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर देशप्रेमाचे धडे बिंबविल्यास भावी नागरिक सक्षम तर बनतीलच; शिवाय देशाच्या अखंडत्वाला आपोआपच मजबुती येईल. या उद्दात्त हेतूने अगदी गाजावाजा करीत सुरू केलेला एमसीसी हा विषय शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वच शाळांमध्ये फाटक्या ड्रेसमध्ये व उसवलेल्या बुटांमध्ये नाईलाजास्तव मुले प्रशिक्षण घेत आहेत. राज्यात नवीनच सत्तेत आलेले युती सरकार याकडे गांभीर्याने पाहणार का? आणि या विषयाला नवसंजीवनी देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार का? हा प्रश्न एमसीसी प्रशिक्षक व विद्यार्थ्यांना पडला आहे. काही मोजक्याच हायस्कूलमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) हा विषय सुरू केला आहे. महाराष्ट्र शासनाने जुलै १९९७ मध्ये गाजावाजा करीत सर्वच शाळांमध्ये महाराष्ट्र छात्र सेना अर्थात एमसीसी हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला. दरम्यान, युतीचे शासन बदलले आणि राज्यात आघाडी सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सुरुवातीला दिलेल्या ड्रेसचाच वापर आजही अनेक विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे काहींचे ड्रेस फाटले, तर काहींचे बूट तुटलेल्या अवस्थेतच दिसतात. काही शाळांमध्ये, तर शालेय युनिफॉर्ममध्येच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. सध्या एमसीसी कवायत स्पर्धा सुरू होण्याच्या लगबगी सुरू झाल्या आहेत; पण विषय शिक्षकांची व विद्यार्थ्यांची मानसिकताच बदलली आहे. युनिफॉर्म नाही, शासकीय पातळीवर नोंद नाही, मग या स्पर्धांचा दिखावा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)शालेय अभ्यासक्रमात अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून एमसीसीकडे पाहिले जाते; पण विविध साधने, सोयी, उपलब्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन योग्य साधने पुरवावीत. - एस. एस. कळंत्रे, एमसीसी प्रशिक्षक, मुरगूड विद्यालय