शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

कळंबा तलावाची पाणीपातळी तेवीस फुटांवर, पर्यटकांची गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:56 AM

आठवड्यातील दोन दिवसांच्या मुसळधार व समाधानकारक पावसाने कात्यायनी टेकड्यात उगम पावलेल्या जयंती नदीसह तलावाचे मुख्य जलस्तोत्र असणारे सातही नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने शुक्रवारी सकाळी कळंबा तलावाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होऊन पाणीपातळी तेवीस फुटांवर पोहोचली.

ठळक मुद्दे कळंबा तलावाची पाणीपातळी तेवीस फुटांवर, पर्यटकांची गर्दी वाढलीप्रतीक्षा सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहण्याची

कळंबा : कोरडा गेलेला जून महिना तर जुलैच्या पंधरवड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने अवघी तीन फूट पाणीपातळी असणारा कळंबा तलाव यंदा पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहणार की नाही याची चिंता सर्वांना लागून राहिली होती परंतु गेल्या आठवड्यातील दोन दिवसांच्या मुसळधार व समाधानकारक पावसाने कात्यायनी टेकड्यात उगम पावलेल्या जयंती नदीसह तलावाचे मुख्य जलस्तोत्र असणारे सातही नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने शुक्रवारी सकाळी कळंबा तलावाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होऊन पाणीपातळी तेवीस फुटांवर पोहोचली.तलावाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने मनोऱ्यावरून भरलेल्या तलावाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे तलावाची पाणीपातळी सत्तावीस फुटांवर गेली की तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्या वरून ओसंडून वाहतो येत्या काहीं दिवसात मुसळधार पाऊस बरसल्यास पाणीपातळी झपाट्याने वाढून तलाव सांडव्या वरून ओसंडून वाहण्याची शक्यता निर्माण झाली असून पर्यटक याकडे आस लावून बसले आहेत तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने कळंबा पाचगाव व उपनगरातील नागरिकांची यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही अशी आशा पल्लवीत झाली आहे.हुल्लडबाजाणा आवराभरलेल्या कळंबा तलावातील पाणीसाठा पाहण्यासाठी महिला व युवती तलावावर येत असून तलावालगत गाड्या लावून तरुणांचे टोळके हुल्लडबाजी करत असते तर मद्यपी प्रेमी व युगलांचे अश्लील चाळे यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. कळंबा तलावाशेजारी करवीर पोलिस स्टेशनची पोलिस चौकी असून पोलिसांनी हुल्लडबाजांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.पाण्याच्या नियोजनाची गरजयंदा पावसाळ्यापूर्वी तलावात फक्त तीन फूट डेड वॉटर अर्थात मृत पाणीसाठा शिल्लक होता पावसाने हुलकावणी दिली असती तर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असती आज समाधानकारक पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाली असली तरी पालिका प्रशासनाने यंदा तरी कळंबा पाचगाव व उपनगरातील पाणीवाटपाचे योग्य नियोजन करणे क्रमप्राप्त आहे. 

 

टॅग्स :dam tourismधरण पर्यटनkolhapurकोल्हापूर