कोल्हापूर: पंचगंगा नदीवरील शिरढोण पुलावर आलं पाणी, कुरुंदवाडशी संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:13 IST2022-07-13T14:13:22+5:302022-07-13T14:13:49+5:30

प्रवाशांना पुन्हा दहा ते बारा किलोमीटर परत जावून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे काही प्रवासी स्वत:च्या जबाबदारीवर जाण्याची पोलिसांकडे परवानगी मागत पोलिसांशी हुज्जत घालत होते.

Water came on Shirdhon bridge on Panchganga river and lost contact with Kurundwad | कोल्हापूर: पंचगंगा नदीवरील शिरढोण पुलावर आलं पाणी, कुरुंदवाडशी संपर्क तुटला

कोल्हापूर: पंचगंगा नदीवरील शिरढोण पुलावर आलं पाणी, कुरुंदवाडशी संपर्क तुटला

गणपती कोळी

कुरुंदवाड : गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शिरढोण- कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंगा नदीवरील शिरढोण पुलावर आज, बुधवारी सकाळी पाणी आले. त्यामुळे शिरढोण-कुरुंदवाड संपर्क तुटला आहे. तर शिरढोण नांदणी रस्त्यावर ओढ्याचे पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

दरम्यान पुराच्या पाण्याला गती असल्याने व त्या पाण्यातून वाहतूक सुरु असल्याने कुरुंदवाड पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बँरेकेटस लावून वाहतुकीसाठी रस्ता बंद केला आहे. वाहतूक रोखण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, मंडल अधिकारी डी. बी. गायकवाड, तलाठी रवी कांबळे, पोलीस पाटील अनुराधा जाधव, सरपंच बाबू हेरवाडे रस्त्यावर गस्त घालत होते.

प्रवाशांची पोलिसांशी हुज्जत

इचलकरंजीहून कुरुंदवाडला जाण्यासाठी शिरढोण मार्ग जवळचा असल्याने या मार्गावरून मोठी वाहतूक असते. मात्र पुलावर पाणी आल्याने व पोलिसांनी वाहतूक बंद केल्याने प्रवाशांना पुन्हा दहा ते बारा किलोमीटर परत जावून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे काही प्रवासी स्वत:च्या जबाबदारीवर जाण्याची पोलिसांकडे परवानगी मागत पोलिसांशी हुज्जत घालत होते.

Read in English

Web Title: Water came on Shirdhon bridge on Panchganga river and lost contact with Kurundwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.