शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चारीही सीमांवर भरारी पथकांचा ‘वॉच’ राहणार

By admin | Updated: October 18, 2015 01:22 IST

महापालिका निवडणूक : दारूची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क झाले सक्रीय

एकनाथ पाटील / कोल्हापूर कार्यकर्त्यांना दारू, मटन दिल्याशिवाय प्रचाराला रंग चढत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत दारूचा महापूर वाहण्याची दाट शक्यता आहे. छुप्या मार्गाने दारू आणण्यासाठी उमेदवारांसह पंटरांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे; परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या चारीही सीमांवर (बॉर्डर) २४ तास ‘वॉच’ ठेवला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे. त्यासाठी उमेदवारांच्या पंटरांनी कार्यकर्त्यांपर्यंत दारूचे बॉक्स पोहोच करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मातब्बर उमेदवारांच्या प्रतिष्ठेमुळे काही प्रभागांत तणाव निर्माण होत आहे. त्यातच कार्यकर्ते दारू पिऊन वावरत असल्याने वादावादीचे प्रसंग घडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून सुमारे अडीच लाख किमतीचा विदेशी मद्याचा साठा टेम्पो ट्रॅव्हलरमधून कोल्हापुरात घेऊन जात असताना राधानगरी-कोल्हापूर रोडवरील तलवार चौकात भरारी पथकाने पकडला होता. याप्रकरणी टेम्पोचालक रोहित रामदास भोसले (रा. जवाहरनगर) याच्याकडे चौकशी केली असता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यसाठा आणल्याचे त्याने सांगितले होते. त्यामुळे मद्य विक्री करणाऱ्या दुकानांच्या विक्रीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाल्यास कारवाई करण्याची तयारी केली आहे. वाहनांची कसून तपासणी गोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवरून विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. गोव्यामध्ये दारूचे दर कमी असल्याने शहरातील उमेदवारांसह पंटरांचा या ठिकाणाहून ट्रक भरून मद्यसाठा आणण्याचा प्लॅन आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाकडून वाहनांची, विशेषत: प्रवासी एस. टी. बस, ट्रॅव्हल्स गाड्या व खासगी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. टोलनाक्यावर गस्त विशेषत: गोव्याहून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होण्याची शक्यता असल्याने तिलारी, गगनबावडा, दाजीपूर, हिरणी, आजरा हे पाच तपासणी नाके सील केले आहेत. त्याचबरोबर शहरातील शिये, शिरोली, उचगाव, शाहू, कळंबा, पुईखडी, फुलेवाडी, सरनोबतवाडी, आर. के. नगर या नऊ नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग व महापालिकेच्या विशेष भरारी पथकांची दिवस-रात्र गस्त ठेवण्यात आली आहे.