कोल्हापुरातील नऊ नगरपालिकांंसाठी आजपासून प्रभाग रचना प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 10:47 AM2022-05-10T10:47:22+5:302022-05-10T10:47:49+5:30

Kolhapur : प्रभाग निश्चित झाल्यानंतर आरक्षण आणि त्यानंतर उमेदवार निवडीच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

Ward formation process for nine municipalities in Kolhapur starts from today | कोल्हापुरातील नऊ नगरपालिकांंसाठी आजपासून प्रभाग रचना प्रक्रिया सुरू

कोल्हापुरातील नऊ नगरपालिकांंसाठी आजपासून प्रभाग रचना प्रक्रिया सुरू

Next

कोल्हापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या नऊ नगरपालिकांच्या स्थगित प्रभाग रचनेची प्रक्रिया आज, मंगळवारपासून पुन्हा सुरू होत आहे. प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ जूनला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. प्रभाग निश्चित झाल्यानंतर आरक्षण आणि त्यानंतर उमेदवार निवडीच्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

मे २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या राज्यातील २०७ आणि जिल्ह्यातील ९ नगरपालिकांसाठी २२ फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली होती. पण ११ मार्चला राज्य शासनाने नगरपंचायत, नगर परिषद, औद्योगिक नगरी अधिनियमात सुधारणा करीत प्रभाग रचनेचे अधिकार निवडणूक आयोगाकडून आपल्याकडे घेतले. यामुळे आयोगाकडून सुरू असलेले प्रभाग रचनेचे काम थांबले.

दरम्यान, ४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर १० मार्चपासून थांबलेली प्रभाग रचनेची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. म्हणून राज्य निवडणूक आयोगाने नुकताच प्रारूप प्रभाग रचना आणि अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार जिल्हा निवडणूक प्रशासन संबंधीत नऊ नगरपालिकांच्या प्रशासनास सूचना दिल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीच्या प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

या नऊ नगरपालिकांची निवडणूक होणार
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, कुरूंदवाड, मलकापूर, मुरगुड, पन्हाळा, वडगाव या नऊ नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. इचलकरंजी नगरपालिकेची आता महापालिका झाली आहे. त्यामुळे तिथे निवडणुकीचे काय होणार, याबद्दल संभ्रम आहे. आयोगाच्या नोटिफिकेशनमध्ये मात्र आजतरी या नगरपालिकेचे नांव आहे.

कार्यक्रम असा :
- हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी : १० ते १४ मे
- हरकती व सूचनांवर सुनावणी : २३ मे
- हरकती, सूचनांचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणे : ३० मे
- अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणे : ६ जून
- अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे : ७ जून

Web Title: Ward formation process for nine municipalities in Kolhapur starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.