शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
3
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
4
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
5
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
6
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
7
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
8
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
9
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
10
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
11
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
12
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
13
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
14
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
15
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
16
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
17
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
18
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
19
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
20
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग निश्चिती, आरक्षण २८ ला?

By admin | Updated: July 12, 2015 00:16 IST

महापालिका निवडणूक : ८२ प्रभाग होणार; हरकतीसाठी दहा दिवसांचा कालावधी

कोल्हापूर : आॅक्टोबरमध्ये होत असलेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेले प्रभाग ज्या दिवशी जाहीर केले जाणार आहेत, त्याच दिवशी जाहीर सोडतीद्वारे त्या-त्या प्रभागातील आरक्षणही जाहीर करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर २८ किंवा २९ जुलै रोजी हे प्रभाग व आरक्षणाची सोडत होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची प्रभाग रचना प्रत्येक दहा वर्षांनी बदलली जाते. यापूर्वी २००५ मध्ये प्रभाग रचना झाली होती; त्यामुळे यंदाची निवडणूक नवीन प्रभाग रचनेप्रमाणे होणार आहे. गतवेळच्या निवडणुकीत ७८ प्रभाग होते. त्यांत आता आणखी चार नवीन प्रभागांची वाढ होणार आहे. सध्या शहराची लोकसंख्या ५ लाख ४९ हजार २२३७ इतकी असून, कमीत कमी ६१००, तर जास्तीत जास्त ७००० लोकसंख्या गृहीत धरून प्रभाग तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे एका प्रभागात सर्वसाधारण साडेपाच ते सहा हजार मतदारांचा समावेश असेल. महानगरपालिकेने प्रभाग रचना तयार केली असून, त्याबाबतचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. पुढील आठवड्यात आयोगाकडून त्यावर मान्यतेची मोहोर उमटविली जाईल आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. ज्या दिवशी प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल त्याच दिवशी प्रभागावरील आरक्षणे सोडतीद्वारे निश्चित केली जाणार आहेत. प्रभाग रचनेबाबत काही हरकती मागविण्यात येणार असून, त्यासाठी दहा दिवसांचा अवधी देण्यात येणार आहे. ज्या दिवशी प्रभाग व आरक्षण निश्चित होईल, त्या दिवसापासून हालचाली गतिमान होतील. (प्रतिनिधी)