Kolhapur-Local Body Election: न सांगता मतदान बॅलेट युनिट बदलले, कागलमध्ये तृतीयपंथी उमेदवार-पोलिसांमध्ये वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:13 IST2025-12-02T12:11:43+5:302025-12-02T12:13:39+5:30
तसंच काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पक्षाच चिन्ह लावून थेट मतदान केंद्रात येत असल्याचा प्रकारही निदर्शनास आणून दिला

Kolhapur-Local Body Election: न सांगता मतदान बॅलेट युनिट बदलले, कागलमध्ये तृतीयपंथी उमेदवार-पोलिसांमध्ये वाद
दुर्वा दळवी
कोल्हापूर: जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान कागलमध्ये सकाळी तृतीयपंथी उमेदवार आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं समोर आले.
सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर कागल शहरातील संत रोहिदास विद्यामंदिर या मतदान केंद्रावर सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तृतीयपंथी उमेदवार जावेद पिंजारी आणि पोलिसांमध्ये न सांगता मतदान बॅलेट युनिट बदलल्याच्या कारणातून वाद निर्माण झाला. तसंच काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पक्षाच चिन्ह लावून थेट मतदान केंद्रात येत असल्याचा प्रकारही या उमेदवारांनी निदर्शनास आणून दिला. यानंतर पोलिसांनी संबंधित राजकीय पक्षांच्या उमेदवार प्रतिनिधींना मतदान केंद्राच्या बाहेर काढलं.
या मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. धीरजकुमार, करवीर विभागाचे पोलीस उपधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी भेट दिली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. या केंद्रावर मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. किरकोळ प्रकार वगळता सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे.
दरम्यान, गडहिंग्लज येथे बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. निवडणूक प्रशासनाने बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला रोखले. जिल्ह्यात सकाळी ११.३० वाजेपर्यंत २८.१२ टक्के मतदान झाले. एकुण २५५७३७ मतदारांपैकी ७१९१२ मतदारांनी मतदान केले आहे.
नगरपालिकेचे नाव, एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी खालील प्रमाणे
नगरपरिषद
- जयसिंगपूर – ४९७४७ पैकी ९०२३, - १८.१४%,
- मुरगूड – १०१२८ पैकी ३४०५ - ३३.६२%,
- मलकापूर - ४९३४ पैकी १७५८ - ३५.६३%
- वडगाव - २३०४४ पैकी ८११९ - ३५.२३%
- गडहिंग्लज- ३०१६१ पैकी ७९६८ - २६.४२%
- कागल – २८७५३ पैकी ९०३३ - ३१.४२%
- पन्हाळा - २९६७ पैकी ९५३ - ३२.१२%
- कुरुंदवाड - २२२२४ पैकी ७५०४ - ३३.७७%
- हुपरी - २४८०२ पैकी ६४२८ - २५.९२%
- शिरोळ - २४५३९ पैकी ६५३१ - २६.६१%
नगरपंचायत
- आजरा -१४६८६ पैकी ४७३७ - ३२.२६%
- चंदगड - ८३१५ पैकी २७२० - ३२.७१%
- हातकणंगले - ११४३७ पैकी ३७३३ - ३२.६४%