पट्टणकोडोलीच्या विठ्ठल-बिरदेव यात्रेस २५ ऑक्टोबरपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:28 IST2021-09-22T04:28:24+5:302021-09-22T04:28:24+5:30

दरम्यान, मुख्य यात्रेस, कोरोनोच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनुमती दिल्यास यात्रा भरविण्यात येईल, अन्यथा प्रमुख मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीतच धार्मिक ...

The Vitthal-Birdev Yatra of Pattankodoli starts from 25th October | पट्टणकोडोलीच्या विठ्ठल-बिरदेव यात्रेस २५ ऑक्टोबरपासून सुरुवात

पट्टणकोडोलीच्या विठ्ठल-बिरदेव यात्रेस २५ ऑक्टोबरपासून सुरुवात

दरम्यान, मुख्य यात्रेस, कोरोनोच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनुमती दिल्यास यात्रा भरविण्यात येईल, अन्यथा प्रमुख मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीतच धार्मिक विधी पूर्ण होतील.

समस्त धनगर समाज, पुजारी मानकरी व भक्तांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन हुपरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी केले.

पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रा सोमवार दि. २५ ऑक्टोबर ते बुधवार २७ ऑक्टोबरपर्यंत पार पाडली जाईल

प्रकाश पाटील, सरपंच विजया जाधव, पुराेहित नंदकुमार जोशी, सिद्राम भाणसे, बापूसोा लाली, मुरा ढबू, राणोजी पुजारी, शंकर भाणसे, रावसाहेब ओमा पुजारी, ग्रामसेवक सिदनाळे, पोलीस पाटील मोहन वर्धन, साताप्पा भवान, अरुण माळी, लक्ष्मण पुजारी, उपसरपंच धुळा डावरे, समस्त धनगर पुजारी समाज, मगदूम, गावडे, कुलकर्णी, जोशी, चौगुले, म्हालदार, चोपदार मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ :

पट्टणकोडोली (ता. हातकणंगले ) येथील प्रसिध्द श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा कार्यक्रम ठरविण्यासाठी श्री विठ्ठल बिरदेव मंदिरात उपस्थित कर्नाटकातील हेगडे-बोते बांधव, समस्त धनगर पुजारी समाज, ग्रामपंचायत पदाधिकारी, मानकरी व ग्रामस्थ.

Web Title: The Vitthal-Birdev Yatra of Pattankodoli starts from 25th October