नंदिनी साहु यांची भेट; सापडलेले तोफगोळे घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:44 IST2021-02-06T04:44:58+5:302021-02-06T04:44:58+5:30

पुरातत्त्व विभागाच्या प्रादेशिक उपसंचालक नंदिनी साहु यांचा नियोजित दौरा पन्हाळा पोस्ट कार्यालयाच्या बांधकाम परवानगीसाठी होता. यातच अचानक पावनगडावर तोफगोळे ...

Visit of Nandini Sahu; Detained artillery seized | नंदिनी साहु यांची भेट; सापडलेले तोफगोळे घेतले ताब्यात

नंदिनी साहु यांची भेट; सापडलेले तोफगोळे घेतले ताब्यात

पुरातत्त्व विभागाच्या प्रादेशिक उपसंचालक नंदिनी साहु यांचा नियोजित दौरा पन्हाळा पोस्ट कार्यालयाच्या बांधकाम परवानगीसाठी होता. यातच अचानक पावनगडावर तोफगोळे सापडल्याने त्यांनी त्या जागेची पाहणी केली. नव्याने या ठिकाणी कोणतीही खोदाई करू नये व सध्या हा किल्ला वनविभागाच्या ताब्यात असल्याने पुरातत्त्व विभाग काहीही करू शकत नाही. हा किल्ला लवकरच पुरातत्त्व विभागाकडे पावनगड किल्ला ताब्यात देण्याविषयी प्रस्ताव वनविभागाकडे दिला जाईल असे सांगितले. दरम्यान, ताब्यात मिळालेले तोफगोळे पन्हाळ्यातील धर्मकोठीमध्ये ठेवले असून या ठिकाणी लवकरच वास्तुसंग्रहालय उभे करणार असून, पन्हाळा व परिसरात सापडलेल्या वस्तू या ठिकाणी सर्वांना पाहण्यास मिळणार असल्याची माहिती नंदिनी साहु यांनी दिली.

फोटो------- पावनगडावर ज्या ठिकाणी तोफगोळे सापडले त्या ठिकाणी भेट देताना पुरातत्त्वच्या प्रादेशिक उपसंचालक नंदिनी साहु व पुरातत्त्वचे कर्मचारी.

Web Title: Visit of Nandini Sahu; Detained artillery seized