ए.वाय.पाटील यांच्या विरोधात विश्वनाथ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST2021-09-21T04:27:57+5:302021-09-21T04:27:57+5:30

कोल्हापूर जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व नसल्याने राधानगरी तालुका काँग्रेस पक्षाचे खच्चीकरण झाले आहे. पंचवीस वर्षे जिल्हा बँकेच्या माध्यमातून काँग्रेस संपवण्याचा ...

Vishwanath Patil against AY Patil | ए.वाय.पाटील यांच्या विरोधात विश्वनाथ पाटील

ए.वाय.पाटील यांच्या विरोधात विश्वनाथ पाटील

कोल्हापूर जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व नसल्याने राधानगरी तालुका काँग्रेस पक्षाचे खच्चीकरण झाले आहे. पंचवीस वर्षे जिल्हा बँकेच्या माध्यमातून काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न झाला आहे. आज कोल्हापूर येथील बैठकीत तालुक्यातील काँग्रेस पक्ष टिकवण्यासाठी व समविचारी पक्षांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस गोकुळचे माजी संचालक पी.डी. धुंदरे, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, भोगावतीचे संचालक संजयसिंह पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

याबाबत भोगावती येथे झालेल्या पत्रकार बैठकीत राधानगरी तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षास प्रतिनिधित्व मिळाले नाही तर संपूर्ण जिल्ह्यात निवडणूक बिनविरोध झाली तरी राधानगरी तालुक्यातून निवडणूक लढवणारच, असे जाहीर केले. गोकुळचे संचालक पी.डी.धुंदरे यांनी काँग्रेस व समविचारी पक्षांना बरोबर घेऊन या निवडणुकीस आम्ही सामोरे जाणार आहोत, असे सांगितले. तर भोगावती संचालक व उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी मागील निवडणुकीत मी पक्षाचा आदेश मानुन माघार घेतली होती व ए.वाय.पाटील यांना मदत केली होती तो पैरा त्यांनी या निवडणुकीत फेडून मला संधी द्यावी, असे सांगितले.

भोगावतीचे विद्यमान संचालक संजयसिंह पाटील,ए. डी. चौगले, धीरज डोंगळे, बी. आर. पाटील, रवींद्र पाटील, जयवंतराव कांबळे, सिरसेचे सरपंच सुभाष पाटील आदी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

फोटो ओळी

राधानगरी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हा बँकेसाठी उमेदवारीची घोषणा करतेवेळी काँग्रेसचे पदाधिकारी.

Web Title: Vishwanath Patil against AY Patil