विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन; कोल्हापुरात २३ मंडळांचे अध्यक्ष, डीजेंवर गुन्हे, ६९ जण अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 18:16 IST2025-09-11T18:15:58+5:302025-09-11T18:16:30+5:30
जुना राजवाडा पोलिसांची कारवाई

विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन; कोल्हापुरात २३ मंडळांचे अध्यक्ष, डीजेंवर गुन्हे, ६९ जण अडकले
कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट करून विद्युत रोषणाईसाठी मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर वापरणे २३ मंडळांना भोवले. जुना राजवाडा पोलिसांनी २३ मंडळांचे अध्यक्ष, डीजेमालक आणि स्ट्रक्चरमालक अशा ६९ जणांवर गुन्हे दाखल केले. या कारवाईमुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले असून, अनेक तरुणांचे करिअर धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे.
आगमनाच्या मिरवणुकीत मंडळांनी आवाजाचा दणदणाट केल्याने विसर्जन मिरवणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात होती. मात्र, मंडळांनी पोलिसांचे आदेश धुडकावून लावत आवाजाचा दणदणाट केला. यासाठी प्रेशर मिड तंत्राचा वापर केला. अवाढव्य आकाराचे स्ट्रक्चर उभे करून रस्ते अडवले. तसेच काही मंडळांनी गर्दीत स्मोकरमधून कार्बनडाय ऑक्साइड सोडून उपस्थितांच्या जीविताला धोका निर्माण केला. पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन मंडळांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करणे, मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर उभे करून रस्ते अडवणे, प्रेशर मिडचा वापर केल्याबद्दल कलम २२३ आणि २८५ नुसार गुन्हे दाखल केले. याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल शिवसेन सर्जेराव पाटील (वय ३६) यांनी बुधवारी (दि. १०) फिर्याद दिली.
यांच्यावर गुन्हे दाखल
शहाजी तरुण मंडळाचा अध्यक्ष तुषार पाटील, रा. शहाजी वसाहत, डीजेमालक प्रथमेश बुचडे, रा. गडहिंग्लज, स्ट्रक्चरमालक ऋषिकेश माने. अवचित पीर तालीम मंडळाचा अध्यक्ष अभिजित पाटील, रा. खरी कॉर्नर, डीजेमालक धनाजी चौगुले, स्ट्रक्चरमालक उदय चव्हाण. संध्यामठ तरुण मंडळाचा अध्यक्ष शिवराज नलवडे, रा. संध्यामठ गल्ली, शिवाजी पेठ, डीजेमालक संदेश पाटील, रा. शिवाजी पेठ, स्ट्रक्चरमालक अक्षय. वेताळ तालीम मंडळाचा अध्यक्ष योगेश पावले, रा. शिवाजी पेठ, डीजेमालक सुमित पारगावकर, रा. म्हसवे, ता. भुदरगड, स्ट्रक्चरमालक ओंकार कन्हेरकर.
हिंदवी स्पोर्टस क्लब, साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ, अध्यक्ष अक्षय पिंजरे, रा. शिवाजी पेठ, डीजेमालक व स्ट्रक्चरमालक सोमनाथ दिंडे, पुणे. रंकाळा वेश तालीम गणेश उत्सव मंडळ, शिवाजी पेठ, अध्यक्ष दिलीप माने, रा. रंकाळा स्टॅन्ड, डीजेमालक व स्ट्रक्चरमालक महादेव खापणे, कै. उमेश कांदेकर ग्रुप, रंकाळा टॉवर अध्यक्ष अवधूत सावंत, रा. रंकाळा टॉवर, डीजेमालक अशोक कांबळे, स्ट्रक्चरमालक शंभुराजे हजारे. महाराष्ट्र सेवा मंडळ, रंकाळा रोड अध्यक्ष फिरोज सय्यद, रा. साकोली कॉर्नर, डीजेमालक जाकी, स्ट्रक्चर मालक आकाश हावळ, शिवाजी तालीम मंडळ शिवाजी पेठ अध्यक्ष महेश पिंजरे रा. आयरेकर गल्ली, डीजेमालक व स्ट्रक्चर मालक (अनोळखी).
दिलबहार तालीम मंडळ अध्यक्ष मेघराज पवार, रा. रविवार पेठ, डीजेमालक अभी मांगलेकर, रा. यादवनगर, स्ट्रक्चरमालक हरीश ढवळे, इचलकरंजी. बालगोपाल तालीम मंडळ अध्यक्ष आकाश साळुंखे, रा. बालगोपाल तालीम मंडळाजवळ, डीजेमालक अजम सोलापुरे, रा. सांगली, स्ट्रक्चरमालक श्रीकांत तुरंबेकर, ता. राधानगरी. सुबराव गवळी तालीम मंडळ प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अध्यक्ष अभिजित क्षीरसागर, रा. लक्ष्मी कॉलनी, मंगळवार पेठ, स्ट्रक्चरमालक किरण भालक. नंगीवली तालीम मंडळ अध्यक्ष तानाजी गायकवाड, रा. नंगीवली चौक, डीजेमालक सागर काळे, रा. अहिल्यानगर, स्ट्रक्चरमालक इंद्रजित ऐनापुरे, रा. फुलेवाडी. पाटाकडील तालीम मंडळ अध्यक्ष विजय जाधव, रा. चौगुलेनगर उजळाईवाडी, डीजेमालक अविनाश कोरवी, रा. कोरोची ता. हातकणंगले,
स्ट्रक्चरमालक गणेश इंचनाळकर. धर्मराज तरुण मंडळ संभाजीनगर अध्यक्ष सागर चावरे, रा. संभाजीनगर, डीजे मालक व स्ट्रक्चरमालक (अनोळखी). पीएम बॉईज अध्यक्ष अनिकेत लोखंडे, रा. लक्षतीर्थ वसाहत, डीजेमालक व स्ट्रक्चरमालक. वाघाची तालीम मंडळ अध्यक्ष रामदास काटकर, रा. उत्तरेश्वर पेठ, डीजेमालक संतोष पवार, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, स्ट्रक्चरमालक मोहसीन मुल्ला. क्रांती बॉईज मंडळ अध्यक्ष नामदेव लोहार, डीजेमालक पृथ्वीराज मंडलिक, रा. रामानंदनगर, कोल्हापूर. बोर तालीम, लक्षतीर्थ वसाहत अध्यक्ष सूरज खराटे, रा. लक्षतीर्थ वसाहत,
डीजेमालक देवा पांढरे, रा. नवे पारगाव. रंकाळा तालीम मंडळ अध्यक्ष संतोष कांदेकर, रा. रंकाळा टॉवर, डीजेमालक विनायक साळुंखे, रा. रंकाळा. चक्रव्यूह तालीम मंडळ, साळुंखे पार्क अध्यक्ष प्रणव चौगुले, रा. साळुंखे पार्क, कोल्हापूर, डीजेमालक नवनाथ इंगवले, रा. पुणे. बालगणेश मित्र मंडळ, बीजीएम सुभाषनगर अध्यक्ष ऋषिकेश बामणे, डीजेमालक सतीश देसाई, रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर. जवाहर नगर मित्रमंडळ अध्यक्ष प्रतीक कोकणे, रा. जवाहरनगर.