शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Kolhapur: ॲड. गिरीश नाईक यांच्यासह २० जणांवर बंदी आदेश उल्लंघनाचा गुन्हा

By उद्धव गोडसे | Updated: June 6, 2024 14:27 IST

पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर विनापरवानगी गर्दी, गुंड अजय शिंदे खुनाचा वाद धुमसतोय

कोल्हापूर : गुंड अजय दगडू शिंदे याचा रंकाळा चौपाटीवर खून झाल्यानंतर यादवनगरात दोन गटात वाद धुमसत आहे. मंगळवारी (दि. ४) रात्री तिघांनी डवरी वसाहतीत काही घरांमध्ये घुसून दहशत माजवल्यानंतर बुधवारी (दि. ५) दुपारी २० ते २५ जण पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी पोहोचले. मात्र, बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी ॲड. गिरीश नाईक यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल केला.घरात घुसून संसारोपयोगी साहित्याची तोडफोड करत दहशत माजवल्याबद्दल शेवंता मोहन जगताप (वय ५०, रा. डवरी वसाहत, यादवनगर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित हल्लेखोर आकाश संजय माळी, सुरेश संजय माळी आणि अनिकेत शामराव जगताप (तिघे रा. यादवनगर) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या तिघांनी फिर्यादी शेवंता जगताप यांच्यासह रेश्मा देवेंद्र शिंदे आणि अर्जुन यशवंत शिंदे यांच्याही घरात घुसून साहित्याची तोडफोड करीत दहशत माजवली.या प्रकारानंतर बुधवारी २० ते २५ जणांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन निवेदन दिले. दहशत माजवणा-या संशयितांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, बंदी आदेश असताना विनापरवानगी गर्दी जमवल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुंड अजय शिंदे याच्या खुनानंतर यादवनगरातील दोन्ही गटातील वाद धुमसत आहे. यातून काही अनुचित प्रकार घडण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.

यांच्यावर गुन्हा दाखलॲड. गिरीश नाईक (रा. कोल्हापूर), जनाबाई निवृत्ती माळी, शेवंता मोहन जगताप, वैजयंती श्रीकांत माळी, लक्ष्मी दशरथ शिंदे, निशा अर्जुन शिंदे, शालन मुनार जगताप, अंजना निवृत्ती माळी, भारती विलास शिंदे, रेश्मा देवेंद्र शिंदे, रेश्मा दीपक जगताप, इश्वर उत्तम माळी, आकाश दशरथ शिंदे, देवेंद्र दशरथ शिंदे, अर्जुन यशवंत शिंदे, संभाजी महादेव शिंदे, श्रीकांत निवृत्ती माळी, मोहन सादू जगताप, करण सुदाम शिंदे आणि दीपक मनोहर जगताप (सर्व रा. यादवनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस