राज्यातील ग्रामरोजगार सेवक उद्यापासून संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:30 IST2026-03-31T18:30:33+5:302026-03-31T18:30:56+5:30

गारगोटी : ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामरोजगार सेवक १ एप्रिल २०२६ पासून संपावर जाणार ...

Village employment workers in the state will go on strike from tomorrow to protest the government's neglect of their pending demands | राज्यातील ग्रामरोजगार सेवक उद्यापासून संपावर

राज्यातील ग्रामरोजगार सेवक उद्यापासून संपावर

गारगोटी : ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामरोजगार सेवक १ एप्रिल २०२६ पासून संपावर जाणार असल्याचा इशारा ग्रामरोजगार सहायक संघटना महाराष्ट्र राज्य, भुदरगड यांनी दिला आहे. याबाबत पंचायत समिती भुदरगड येथील गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांना निवेदन देण्यात आले.

संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की,‘२ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार ग्रामरोजगार सहायक हे अर्धवेळ कर्मचारी असून त्यांना निश्चित वेतन किंवा मानधन दिले जात नाही. त्यामुळे उपजीविकेसाठी त्यांना इतर कामे करावी लागतात. सध्या एनएमएमएस प्रणालीद्वारे दोन वेळा हजेरी घेण्याची सक्ती करण्यात येत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत.

दरम्यान, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य शासनाने ग्रामरोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन व २ हजार रुपये प्रवास भत्ता देण्याचा शासन निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला सुमारे १८ महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही अशी नाराजी संघटनेने व्यक्त केली आहे.

शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी तसेच २ मे २०११ चा शासन निर्णय बदलून अर्धवेळ ऐवजी पूर्णवेळ सेवा लागू करावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत राज्यातील ग्रामरोजगार सेवक संपावर राहणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर तालुकाध्यक्ष रमेश जाधव, उपाध्यक्ष दीपक डोंगरे, सचिव अनिल ईर, कार्याध्यक्ष जॉयल बारदेस्कर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title : महाराष्ट्र ग्राम रोजगार सहायक अपनी मांगों को लेकर हड़ताल पर

Web Summary : महाराष्ट्र में ग्राम रोजगार सहायक 1 अप्रैल, 2026 से हड़ताल पर जाएंगे, क्योंकि समय पर वेतन और पूर्णकालिक रोजगार जैसी मांगें पूरी नहीं हुई हैं। 2024 के सरकारी आदेश के बावजूद वेतन वृद्धि में देरी हो रही है। सहायक तत्काल कार्रवाई की मांग कर रहे हैं और हड़ताल जारी रखने की धमकी दे रहे हैं।

Web Title : Maharashtra Village Employment Aides to Strike Over Unfulfilled Demands

Web Summary : Village Employment Aides in Maharashtra will strike from April 1, 2026, protesting unfulfilled demands like timely wages and full-time employment. Despite a 2024 government order for increased pay, implementation is delayed. The aides are demanding immediate action and threaten continued strike action.