कोल्हापूर : गावठाण उतारा देण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील ग्राम विकास अधिकारी गोरख दिनकर गिरीगोसावी, (वय- ५०, सद्या रा.पंत मंदीर जवळ, शिवाजीनगर, कणेरीवाडी, ता.करवीर, जि.कोल्हापूर, मुळ रा.सिंगापूर, ता.पुरंदरे, जि.पुणे) असे त्याचे नाव आहे. आज, शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.तक्रारदार यांना कर्ज प्रकरण मंजुरी मिळवण्याकरीता त्यांच्या राहते घराचा गावठाण उतारा हवा होता. त्यांनी उतारा मिळण्याकरीता अर्ज केला होता. हा गावठाण उतारा देण्यासाठीसाठी गिरीगोसावी यांनी तक्रारदार यांच्याकडे २ हजारची मागणी करून ही रक्कम तक्रारदार यांचेकडून स्वतः स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Kolhapur: दोन हजाराची लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक
By समीर देशपांडे | Updated: October 13, 2023 17:03 IST