शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तेसाठी विद्या परिषदेचे सहकार्य

By admin | Updated: January 22, 2015 00:11 IST

एन. जे. पवार : शिवाजी विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत सत्कार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण शैक्षणिक धोरणे व दिशा निश्चितीसाठी विद्या परिषदेने मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो, अशा शब्दांत कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी आज, सोमवारी आपल्या कृतज्ञतापूर्ण भावना व्यक्त केल्या. विद्यापीठाच्या विद्या परिषदेची बैठक राजर्र्षी शाहू सभागृहात झाली. बैठक संपल्यानंतर कुलगुरू डॉ. पवार यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, बीसीयुडी संचालक डॉ. अर्जुन राजगे यांचा विद्या परिषदेतर्फे सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीला दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य विद्या परिषद करते. वाद-प्रतिवादाला व्यक्तिगत संघर्षाचे रूप येऊ न देता विद्यापीठाचे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक हित जोपासण्याला सर्वांचेच प्राधान्य राहिले. विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीमधील सुधारणा करण्याचा विषय हा संवेदनशील होता. त्यासाठी विद्या परिषदेने घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेमुळेच विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली सुविधा निर्माण करू शकलो. डॉ. भोईटे म्हणाले, सर्वच सहकाऱ्यांसमवेत काम करताना जी एकतानता आणि एकवाक्यता जुळली, त्याला तोड नाही. डॉ. राजगे म्हणाले, विद्यापीठात माझ्यापरीने परिपूर्ण योगदान देण्याचा मी प्रयत्न केला. काही कटू निर्णय घेण्याची वेळ आली; परंतु वैयक्तिक संबंधांमध्ये कटुता कधी येऊ दिली नाही. यावेळी डॉ. डी. के. मोरे, प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, प्रा. जे. एस. पाटील, डॉ. एस. ए. पाटील यांची भाषणे झाली. धनंजयराव गाडगीळ कॉलेजला स्वायतत्ता...साताऱ्यातील धनंजयराव गाडगीळ कॉलेज आॅफ कॉमर्सला प्रदान करावयाच्या स्वायतत्तेस मान्यता देण्याबाबत व्यवस्थापन परिषदेला शिफारस करण्याबाबत आज विद्या परिषदेच्या बैठकीत शिफारस करण्यात आली.