कोल्हापुरात तळसंदेनंतर आता पेठवडगावातील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 12:41 IST2025-10-11T12:39:20+5:302025-10-11T12:41:52+5:30
संबंधित शाळेने मात्र याप्रकाराबाबत दुजोरा दिला नाही

कोल्हापुरात तळसंदेनंतर आता पेठवडगावातील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
पेठवडगाव: तळसंदेमधील एका शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी रॅगिग करत विद्यार्थ्यांना बेल्ट, बॅटने मारहाण केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली होती. दरम्यानच आज, पुन्हा पेठवडगाव परिसरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. याबाबत संबंधित शाळेने मात्र दुजोरा दिलेला नाही.
वाचा- बेल्ट, बॅट, दांडक्यांनी विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल; कोल्हापुरातील एका हॉस्टेलमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस
सध्या वडगावातील व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांस अन्य दहा ते बारा विद्यार्थ्यी हाताने मारहाण करत आहेत. सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ज्या शाळेचे नाव सामोरे आले आहे त्या शाळेचा अलिकडच्या काळात असा शाळेचा गणवेश नाही. संबंधित शाळेने हा प्रकार आमच्या शाळेशी संबंधित आहे काय यांची पडताळणी करीत असल्याचे सांगितले. संबंधितानी अशी घटना वेळीच निदर्शनास आणून द्याव्यात.
जुने व्हिडिओ आता का होतायत व्हायरल?
तळसंदे येथील हॉस्टेलमधील मारहाणीचे जुने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इतक्या दिवसानंतर हे व्हिडिओ आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वेळीच हे व्हिडिओ शासकीय यंत्रणेस किंवा शाळा व्यवस्थापन दिले असते तर कठोर कारवाई झाली असती. असे व्हिडिओ ज्या त्या वेळेस निदर्शनास आले पाहिजे म्हणजे अशा घटनाना चाप बसेल.