शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

: लग्नात हुंडा म्हणून खोरे, टिकाव, पाट्या, झाडे अन् मधपेट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

निसर्ग आणि वन्यप्राण्यांच्या सान्निध्यात असणाऱ्या दिनकरांवाबरोबर त्यांची सावली बनून मुलगी रोहणी त्याच्या सोबत असायची. त्याच्यातून तिच्या मनात निसर्गाबद्दल आवड ...

निसर्ग आणि वन्यप्राण्यांच्या सान्निध्यात असणाऱ्या दिनकरांवाबरोबर त्यांची सावली बनून मुलगी रोहणी त्याच्या सोबत असायची. त्याच्यातून तिच्या मनात निसर्गाबद्दल आवड निर्माण झाली. तिने मधमाशांचे पोळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे प्रशिक्षण घेऊन शंभरच्यावरती मधांचे पोळे स्थलांतरित केले आहेत.

राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अरण्याशेजारी असणाऱ्या कंदलगावातील विलास कदम यांच्याशी रोहणी चौगुले हिचे लग्न ठरले. लग्न ठरविताना ठरवण्यात आलेल्या ठरावांचा यादी लिहावयाच्या असतात. यादीत घरच्या परिस्थितीनुसार मानपानाचा उल्लेख केला जातो. वरांकडील झालेल्या बोलणीनुसार वधूपक्षाकडून १०० भारतीय जातीची झाडे, पन्नास सातेरी मधपेट्या, दोन खोरी, दोन टिकाव आणि दोन लोखंडी पाट्या देण्याचे आणि घेण्याचे यादीत नमूद करण्यात आले आहे तसेच वरपक्षाकडून त्याला मान्यता असल्याच्या यादीवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

वधूवरांना प्रत्येक दोन जोडी यासाठी देण्यात आली आहे की विलास कदम हा शासकीय कर्मचारी असल्याने त्यांची प्रत्येकवेळी बदली होणार या दृष्टीने नवीन कार्यालयात जाण्यापूर्वी त्या परिसरात पाच झाडे लावण्यासाठी एक जोडी तर दुसरी जोडी घरात प्रत्येक वर्षी नवीन पाच झाडे घराच्या परिसरात लावण्यासाठी देण्यात आली आहे. प्रत्येक आईबापाने जर लग्नकार्यात निसर्ग वाचविण्यासाठी दिनकररावांनी केलेल्या कार्याचा आदर्श घेतला तर निसर्गही वाचेल आणि देशही वाचेल.

चौकट

लग्नाच्या यादीत वधू-वराच्या घरच्या परिस्थितीनुसार वधूस मंगळसूत्र, कपडे, दागिने, विवाह खर्च कुणी करायचा, मुहूर्त कधीचा धरायचा, जाणे-येणे कुणी बघायचे यासह अन्य ठरावांचा समावेश असतो. अलीकडे वधूकडून हुंडा घेण्यास सक्त मनाई असल्याने यादीत पैशाचा उल्लेख होत नाही. या संपूर्ण बाबींना बगल देऊन वराकडूनच झाडे, मधपेट्या आणि टिकाव, खोर, पाट्यांची मागणी होऊन त्याचा यादीत समावेश होत असेल तर यावर कोणाचा विश्वास बसणार नाही..!