शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

वैशाली डकरे होणार नव्या महापौर

By admin | Updated: July 1, 2015 00:47 IST

नाट्यपूर्ण घडामोडी : महापौरपदासाठी एकमेव अर्ज दाखल; अधिकृत घोषणा शनिवारी

वैशाली डकरे होणार नव्या महापौर नाट्यपूर्ण घडामोडी : महापौरपदासाठी एकमेव अर्ज दाखल; अधिकृत घोषणा शनिवारीकोल्हापूर : महापौरपदासाठी इच्छुकांनी केलेले जोरदार प्रयत्न, ताणलेली उत्कंठा आणि गेल्या २४ तासांत पडद्यामागे घडलेल्या जोरदार हालचाली, अशा नाट्यपूर्ण घडामोडींनंतर कॉँग्रेसकडून कोल्हापूरच्या ४२ व्या महापौरपदाच्या उमेदवार म्हणून वैशाली राजेंद्र डकरे यांच्या नावावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. डकरे यांचा एकमेव अर्ज आल्याने शनिवारी (दि. ४) होणाऱ्या विशेष सभेत त्यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण होईल. दरम्यान, दुपारी दीड वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत कॉँग्रेस कमिटीच्या कार्यालयात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी नगरसेवकांशी वैैयक्तिकरीत्या बंद खोलीत चर्चा करून मते जाणून घेतली. यानंतर चार वाजता फोन करून निरोप देतो, त्यावेळी नाव जाहीर करण्यात येईल, असे सांगून सतेज पाटील यांनी मुलाखतीचे सोपस्कार आटोपून कार्यालय सोडले.गटनेते, कारभारी, पदाधिकारीही नावाबाबत अनभिज्ञ होते. शारंगधर देशमुख व सचिन चव्हाण मधल्या काळात जनसुराज्य व राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. दर पाच मिनिटांच्या घडामोडी व चर्चा नेत्यांच्या कानांवर घातली जात होती. चर्चेतून मार्ग काढू, काळजी करू नका, असा प्रा. जयंत पाटील यांचा निरोप आल्यानंतरच सर्वांनी सुस्कारा सोडला.मात्र, चार वाजल्यानंतर इच्छुकांमध्ये घालमेल सुरूझाली. नवीन महापौर कोण होणार याची उत्कंठा मुदत संपण्यास तास राहिला तरी टिकून होती. मीना सूर्यवंशी की वैशाली डकरे यांच्या नावांत एकमत होत नव्हते. अखेर ४ वाजून २० मिनिटांनी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांना सतेज पाटील यांनी फोन करून वैशाली डकरे यांच्या नावाची घोषणा करण्यास सांगितले. एकमताने घेतलेला हा निर्णय सर्वांनी स्वीकारावा, असे आवाहन चव्हाण करीत असतानाच नगरसेविका मीना सूर्यवंशी व माजी नगरसेवक नंदकुमार सूर्यवंशी हे नाराज होऊन बैठक सोडून निघून गेले.यानंतर डकरे यांनी समर्थकांसह महापालिका गाठली. नगरसचिव उमेश रणदिवे यांच्याकडे अनुक्रमे अजित पवार व प्रदीप उलपे आणि अर्पणा आडके व रेखा पाटील सूचक व अनुमोदक असलेले दोन अर्ज ४ वाजून ३९ मिनिटांनी दाखल केले. दरम्यान, जनसुराज्य पक्षाचे नगरसेवक व विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव यांनी दुपारी एक वाजता दोन अर्ज नेले होते. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतरही दगाफटका व्हायला नको, यासाठी पाच वाजेपर्यंत कॉँग्रेसचे सर्व पदाधिकारी नगरसचिव कार्यालयात ठाण मांडून बसलेले होते. महापौरपदाचा एकच अर्ज दाखल झाल्याचे स्पष्ट होताच डकरे समर्थकांनी महापालिकेच्या दारात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करुन जल्लोष व्यक्त केला.कहीं खुशी, कहीं गममहापौरपदासाठी नाव निश्चित करताना सतेज पाटील यांचा कस लागला. राजेंद्र डकरे, नंदकुमार सूर्यवंशी तसेच सुरेश ढोणुक्षे हे माजी नगरसेवक पाटील यांचे नेतृत्व मानणारे आहेत. त्यामुळे अवघ्या चार महिन्यांचा महापौर करताना पाटील यांना तारेवरची कसरत करावी लागली. कॉँग्रेस कमिटीत त्यामुळेच दिवसभर तणाव होता. महापौरपदाचे नाव जाहीर होताच ‘कहीं खुशी, कहीं गम’ असेच वातावरण नगरसेवक व कार्यकर्त्यांत होते.