महावीर महाविद्यालयात लसीकरण (वाणिज्य वृत्त)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:15 IST2021-02-05T07:15:46+5:302021-02-05T07:15:46+5:30

कोल्हापूर : महावीर महाविद्यालयात रविवारी झालेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष श्रीकांत झेंडे ...

Vaccination at Mahavir College (Commerce News) | महावीर महाविद्यालयात लसीकरण (वाणिज्य वृत्त)

महावीर महाविद्यालयात लसीकरण (वाणिज्य वृत्त)

कोल्हापूर : महावीर महाविद्यालयात रविवारी झालेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष श्रीकांत झेंडे व एनसीसीच्या ऑनररी मेजर प्रा. डॉ. रुपा शहा यांच्या उपस्थितीत झाली.

यावेळी रुपा शहा यांनी लसीकरण मोहिमेत रोटरी क्लब व एनसीसीचा मोलाचा वाटा आहे. भारत पोलिओमुक्त झाल्याची घोषणा २०१४ साली करण्यात आली असून, हे भारताचे यश आहे. हे यश टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे सांगितले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाचे डॉ. व्ही वाय. खैरमोडे, ऐश्वर्या साबणे, सना शेख, संगीता गावडे, दीपाली शिंदे, महेश सातपुते यांनी परिश्रम घेतले. त्यांना रोटरीचे कायर्वाह चंदन मिरजकर, खजिनदार श्रीकांत मोरे, प्रकल्प समन्वयक चेतन भोसले तसेच महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, एनसीसीच्या छात्रसैनिक ज्योती कपले, भावना मोरे, रमेश गुरव व प्रांतकुमार गौड यांनी सहकार्य केले.

---

फोटो नं ३१०१२०२१-कोल-रोटरी लसीकरण

ओळ : कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयात रविवारी पोलिओ लसीकरणाची सुरुवात रोटरीचे श्रीकांत झेंडे व प्रा. डॉ. रुपा शहा यांच्या उपस्थितीत झाली.

--

Web Title: Vaccination at Mahavir College (Commerce News)