जिल्ह्यात ५४५ लाभार्थ्यांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:26 AM2021-01-20T04:26:02+5:302021-01-20T04:26:02+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभरात ११ आरोग्य संस्थांमध्ये ५४५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. बुधवार, शुक्रवार आणि शनिवारीही लस देण्यात येणार ...

Vaccination of 545 beneficiaries in the district | जिल्ह्यात ५४५ लाभार्थ्यांना लसीकरण

जिल्ह्यात ५४५ लाभार्थ्यांना लसीकरण

Next

कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभरात ११ आरोग्य संस्थांमध्ये ५४५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. बुधवार, शुक्रवार आणि शनिवारीही लस देण्यात येणार आहे. मात्र अजूनही अनेकांच्या मनातील भीती गेली नसल्याने पूर्ण क्षमतेने लसीकरण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लस घेण्यास सुरुवात केली आहे.

कोवीशिल्डच्या लसीकरण मोहिमेत मंगळवारी जिल्ह्यातील ५४५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. यात ४६६ महिलांचा, तर १७० पुरुषांचा समावेश आहे. एकूण ११ केंद्रापैकी कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात ८६ जणांनी लस घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनीही लस घेतली. ११ केंद्रांवर ११०० जणांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पहिल्या दिवशी आणि मंगळवारीही निम्म्याच जणांनी लस घेतली आहे. आता बुधवार, शुक्रवार आणि शनिवारीही याच ११ केंद्रांवर सकाळी ९ ते ५ या वेळेत लस देण्यात येणार आहे. त्याच्या पुढच्या आठवड्यात केंदरे बदलण्यात येणार आहेत.

चौकट

लस घेतल्यानंतर केली हृदयशस्त्रक्रिया

सीपीआरमधील हृदयरोग तज्ज्ञ अब्दूल मजिद यांनी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी लस घेतली. त्यानंतर १ वाजता त्यांनी बायपास शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. ही शस्त्रक्रिया पाच तास चालली. यावेळी डॉ. विदुर कर्णिक, डॉ. भूपेंदर पाटील, भूलतज्ज्ञ डॉ. हेमलता देसाई उपस्थित होत्या. १६ जानेवारी रोजी डॉ. अक्षय बाफना यांनीही लस घेतल्यानंतर त्याच दिवशी अशीच एक हृदयशस्त्रक्रिया केली होती.

चौकट

आधी नोंदणी केलेल्यांना तत्काळ लस

आजच्या लसीकरणावेळी आणखी एक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आधी ज्याची नोंदणी करण्यात आली आहे, असा इच्छुक लाभार्थी ऐनवेळी जर केंद्रांवर गेला तर त्याला तत्काळ लस देण्याची सुविधा कोविन अपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास ३० जणांनी अशा पद्धतीने या नव्या सुविधेचा वापर करून लस घेतली.

१९०१२०२१ कोल सीपीआर ०२

लस घेतल्यानंतर डॉ. अब्दूल मजिद यांनी एका रुग्णावर बायपास शस्त्रक्रिया केली.

Web Title: Vaccination of 545 beneficiaries in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.