शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६ लाख ३७ हजारजणांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:23 IST

कोल्हापूर : देशभरातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना १ एप्रिलनंतर कोव्हिड प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...

कोल्हापूर : देशभरातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना १ एप्रिलनंतर कोव्हिड प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याचा कोल्हापूर जिल्ह्यातील ६ लाख ३७ हजार नागरिकांना फायदा होणार आहे.

जानेवारीपासून कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणास प्रारंभ झाला. यामध्ये सुरुवातीला आरोग्य विभागातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कर्मचारी, पोलीस यांचा समावेश होता अशांना लस देण्यात सुरुवात झाली. त्यानंतर ४५ वर्षांवरील आजार असणाऱ्या आणि ६० वर्षांवरील सरसकट नागरिकांना लस देण्यास सुरुवातीही झाली.

परंतु कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता केंद्र शासनाने ४५ वर्षांवरील सरसकट सर्वच नागरिकांना लस देण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. १ एप्रिल २०२१ पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात नागरी आणि ग्रामीण लोकसंख्या विचारात घेता ४५ वर्षांवरील ६ लाख ३७ हजार २७६ नागरिकांना या नव्या घोषणेनंतर लस देण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात १२३ शासकीय आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण करण्यात येत असून, ३४ खासगी रूग्णालयांमध्ये सशुल्क लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी ४८ हजार ५०० डोस जिल्ह्यात दाखल झाल्यामुळे आता जिल्ह्यात आणखी सहा दिवस पुरेल एवढा साठा आहे. मात्र आता १ एप्रिलनंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना सरसकट लस देण्याचे नियोजन असल्याने साहजिकच डोसची आवक वाढवावी लागणार आहे.

चौकट

अ.नं. तालुका ४५ टक्क्यांवरील लसीकरणासाठी पात्र लोकसंख्या

१ आजरा १९,७७३

२ भुदरगड २४७२३

३ चंदगड ३०,७८२

४ गडहिंग्लज ३७,११५

५ गगनबावडा ५८८२

६ हातकणंगले १,३२८०६

७ कागल ४५,२७६

८ करवीर १,७०,६१६

९ पन्हाळा ४२६५२

१० राधानगरी ३२८३६

११ शाहूवाडी ३०,५२६

१२ शिरोळ ६४२८९

एकूण ६,३७,२७६

चौकट

आजार दाखवून लस घेणे आता बंद

लस घेण्याबाबत नागरिक सजग झाल्याने ४५ वर्षांवरील सरसकट नागरिक लस घेण्यासाठी इच्छुक होते. मात्र ४५ ते ५९ वयोगटातील केवळ मधुमेह, रक्तदाब आणि अन्य आजार असणाऱ्यांनाच लस देण्याची मुभा होती. त्यामुळे अनेकांनी आपल्याला आजार असल्याचे खोटेच नोंदवून लस घेतली होती. मात्र आता केंद्र सरकारने सरसकट परवानगीच दिल्याने खोटेपणा करावा लागणार नाही.

चौकट

१ लाख ५३ हजार जणांना जुने आजार

आरोग्य विभागाने २००१, २०११ च्या लोकसंख्येचा आधार घेऊन २०२१ ची संभाव्य लोकसंख्या काढली आहे. त्यातील ठराविक टक्केवारीनुसार ही ४५ वर्षांवरील नागरिकांची आकडेवारी काढण्यात आली आहे. यातील १ लाख ५३ जणांना जुने आजार असल्याचे गृहितक यातून मांडण्यात आले आहे. तर ६० वर्षांवरील नागरिक ५ लाख ९ हजार असल्याचे शासकीय आकडेवारी सांगते.