शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

US-Israel-Iran war: आखाती देशात अडकले २०७ कोल्हापूरकर, २३ जण सुखरूप परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 11:36 IST

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क : दुबईहून ८० नागरिक शुक्रवारी परतणार

कोल्हापूर : इराण आणि इस्रायल या देशांमधील युद्धामुळे आखाती देशात जिल्ह्यातील २०७ नागरिक अडकले आहेत. यापैकी पर्यटनासाठी गेलेले २३ नागरिक सुखरूप परतले असून, ८० नागरिक दुबईहून निघून शुक्रवारी जिल्ह्यात पोहोचतील. ३९ नागरिक व कुटुंबीय नोकरीनिमित्त त्या देशात राहत असून, ते सुरक्षित आहेत. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष, हेल्पलाइन कार्यरत आहे नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.आखाती देशांमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षित सुटका आणि परतीसाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.पालकमंत्री आबिटकर म्हणाले, जिल्हा प्रशासनाने तिकडे अडकलेल्या नागरिकांशी सतत संपर्क ठेवावा. केंद्र व राज्य शासनाच्या समन्वयाने अडकलेले नागरिक, पर्यटक, नोकरीनिमित्त गेलेले व्यक्ती आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीचे नियोजन केले जात आहे. ज्यांचे कुटुंबीय परदेशात अडकले आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये.

ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत, त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधून त्यांची माहिती द्यावी. जिल्ह्यात यासाठी स्वतंत्र संपर्क कक्ष व विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आवश्यक मदतीसाठी सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

आखाती देशात अडकलेले जिल्ह्यातील नागरिक असे - दुबई येथे पर्यटनासाठी गेलेले पर्यटक : १५९- कतार, दुबई, इराण, इस्रायल, मोरोक्को, सौदी अरेबिया, शारजाह, कुवेत, बहरीन आणि ओमान येथे नोकरीनिमित्त गेलेले नागरिक : ३९- कतार, शारजाह व बहरीन येथे नोकरीनिमित्त गेलेल्या कुटुंबातील सदस्य : ७- दुबई येथे शिक्षण व प्रशिक्षणासाठी गेलेले नागरिक : २

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Residents Stranded Amidst US-Israel-Iran War; Some Return Safely

Web Summary : 207 Kolhapur residents are stranded in Gulf countries due to the Iran-Israel conflict. 23 tourists have returned safely. A helpdesk is active for assistance, ensuring the safety of those abroad.