Kolhapur: टाकवडेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर अज्ञातांनी रात्रीत उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:30 IST2025-05-14T14:29:08+5:302025-05-14T14:30:07+5:30

गणपती कोळी  कुरुंदवाड: टाकवडे (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागेत मंगळवारी रात्री अज्ञात शिवभक्त तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती ...

Unknown persons erected a statue of Chhatrapati Shivaji Maharaj at night in front of the Gram Panchayat office in Takwade Kolhapur | Kolhapur: टाकवडेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर अज्ञातांनी रात्रीत उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 

Kolhapur: टाकवडेत ग्रामपंचायत कार्यालयासमोर अज्ञातांनी रात्रीत उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 

गणपती कोळी 

कुरुंदवाड: टाकवडे (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागेत मंगळवारी रात्री अज्ञात शिवभक्त तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळा उभारला आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. 

ही घटना समजताच प्रांताधिकारी मौसमी चौगुले,  पोलिस उप अधीक्षक डॉ रोहिणी सोळंखे, शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी, शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी विनापरवाना पुतळा बसविणे चुकीचे असून याची दुरुस्ती करुन घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने तणाव निर्माण झाला होता.

तर उपस्थित शिवप्रेमींनी पुतळा हलविणार नसल्याची भूमिका घेतल्याने पुतळ्यापासून शंभर मीटर अंतरापर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Unknown persons erected a statue of Chhatrapati Shivaji Maharaj at night in front of the Gram Panchayat office in Takwade Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.