शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

व्यापा­ऱ्यांची एकजुटीने सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST

----- संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू ...

-----

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू जाहीर केला व लगेचच दोन दिवसांनी म्हणजे २४ मार्च २०२० रोजी देशात पूर्णतः लाॅकडाऊन जाहीर केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २६ मार्च रोजी कणकवली तालुक्यातील नडगिवे येथे आढळला. तेथून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. या दरम्यान रोज महाराष्ट्र सरकार, भारत सरकारची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होत होती. या तत्त्वानुसार संपूर्ण जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता ३० जूनपर्यंत लाॅकडाऊन केले होते. या ३ महिन्यांच्या कालावधीमध्ये नोटाबंदीचा कार्यकाळ आठवायला लागला. कारण नोटाबंदीच्या वेळीदेखील सरकारतर्फे रोज नवीन नियमांची भर पडायची. त्यामुळे या लाॅकडाऊनच्या कालावधीतदेखील जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, स्थानिक प्रशासन यांची रोज नवनवीन नियमांची भर पडत होती. यामध्ये कोणत्याही प्रकारचा सुसंवाद नसल्याने त्याचा नाहक मनस्ताप व्यापारी बंधू व जनता यांना सहन करावा लागत होता. त्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी होऊन कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होत होती.

कोरोना संसर्गजन्य रोग असल्याचे सरकारने बनविलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होणे आवश्यक होते; परंतु लाॅकडाऊन व लाॅकआऊट या मधील फरक न कळल्याने ग्राहकांची झुंबड वाढतच होती. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याने बऱ्याच वेळा वादाचे प्रसंग निर्माण होत होते. याकरिता अत्यावश्यक सेवेतील व्यापाऱ्यांना महसूल व पोलीस प्रशासनाची आवश्यक ती परवानगी घेऊन ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. कणकवली तालुका व्यापारी संघटनेने केलेले कार्य काैतुकास्पद होते. या कार्यकाळात पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून सामान्य जनतेकरिता झटत होते. कणकवली तालुका व्यापारी संघाच्यावतीने या कोरोना योद्धयांना मास्क, हॅण्डग्लोव्हजचे वाटप केले गेले. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील व्यापारी, भाजीवाले, दूधवाले यांनाही मास्क वाटप करण्यात आले.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मास्क मिळविण्यासाठी जाचक प्रयत्न करावे लागले. N65 हाच मास्क वापरणे अशा प्रकारचाही सरकारचा आदेश असल्यामुळे त्याची उपलब्धताही फार कमी होती. तरीही या मास्कचे वाटप करण्यात आले.

जुलै महिन्यात लॉकडाऊन थोड्या फार प्रमाणात शिथिल झाला, पण त्याचवेळी कणकवली शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. जिल्ह्यात कणकवली तालुक्यात सर्वांत जास्त रुग्ण सापडले होते. याच दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या नवनवीन नियमांमुळे व्यापाऱ्यांमध्ये अनेकवेळा संभ्रमावस्था झाली होती. बऱ्याच वेळा वादाचे प्रसंगही निर्माण झाले होते. अत्यावश्यक सेवा देणे हा सरकारचा आग्रह असल्याने इतर व्यापारी व किराणा व्यापारी यांच्यामध्ये दुराव्याचे संबंध निर्माण झाले होते. त्यातच प्रवास करण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने अपुरा कामगार वर्ग या सर्व समस्यांचा सामना करत अत्यावश्यक सेवा सरकारच्या नियमांत राहून देणे अनिर्वाय व बंधनकारक होते. याच दरम्यान काही सार्वजनिक संस्थांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासन व व्यापारी यांची मीटिंग वेळोवेळी होत असतानाही प्रशासनाला निर्णय घेणे भाग पडले. या सर्व गोष्टी घडत असतानाही कणकवली शहरातील सर्व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन गरजू लोकांची उपासमार होऊ नये या सामाजिक भावनेतून खाद्य उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये व्यापारी संघाचा विशेष सहभाग होता .

राजेश राजाध्यक्ष

(लेखक कणकवलीतील व्यापारी आहेत)

या लेखाला फोटो मिळालेले नाहीत. मिळाले तर मागाहून पाठवितो. अन्यथा फाईल फोटो घ्यावा.