कुशाग्र बुद्धीच्या दूर्वांकचा अनोखा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:03+5:302021-02-05T06:58:03+5:30

कोल्हापूर : तब्बल २०० मानवी रोगजन्य विषाणूंची नावे २ मिनिटे ३७ सेकंदांत न थांबता सांगत आठ वर्षीय दूर्वांक गुरुदत्त ...

A unique record of sharp intellect | कुशाग्र बुद्धीच्या दूर्वांकचा अनोखा विक्रम

कुशाग्र बुद्धीच्या दूर्वांकचा अनोखा विक्रम

कोल्हापूर : तब्बल २०० मानवी रोगजन्य विषाणूंची नावे २ मिनिटे ३७ सेकंदांत न थांबता सांगत आठ वर्षीय दूर्वांक गुरुदत्त गावडे याने जागतिक विक्रम केला. कुशाग्र बुद्धीच्या दूर्वांकला पालकांसमवेत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

दूर्वांक हा शांतीनिकेतन स्कूलमध्ये तिसरीच्या वर्गात शिकतो. वडील खासगी वाहक आहेत तर आई वंदना गावडे सीपीआरमध्ये नर्स आहेत. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त नावे तोंडपाठ सांगण्याचा दूर्वांकने केलेल्या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. दूर्वांक हा लहानपणापासून चौकस बुद्धीचा असल्याने वयाच्या चौथ्या वर्षीच त्याला ॲबॅकसचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय विज्ञान, आंतरराष्ट्रीय गणित व राष्ट्रीय संगणक ऑलिम्पियाड यांसारख्या परीक्षांमध्ये सुवर्णपदक पटकावले. ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिपमध्येही सुवर्णपदक मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली.

दूर्वांकची कुशाग्र बुद्धी ओळखून पालकांनी त्याच्याकडे लक्ष दिल्याने चांगले यश मिळत आहे. त्याला चाटे स्कूलचे चंद्रकांत पाटील, ॲबॅकसच्या प्रणाली आमते, धनराज आमते, शांतीनिकेतन प्रशालेचे संजय डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो: २९०१२०२१-कोल-दूर्वांक

फोटो ओळ : कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते दूर्वांक गावडे याचा पालकांसमवेत सत्कार झाला.

Web Title: A unique record of sharp intellect