शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ‘उमेश’चे धवल यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 11:14 IST

लक्ष्मीपुरीतील हॉटेलमध्ये आठ तास काम करून उमेश राजाराम खोत याने बारावीच्या परीक्षेत ८०.९२ टक्के गुणांसह धवल यश मिळविले आहे. त्याचे मूळ गाव पडखंबेपैकी खोतवाडी (ता. भुदरगड) असून कोल्हापुरातील शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे.

ठळक मुद्देहॉटेलमध्ये काम करणाऱ्या ‘उमेश’चे धवल यशसी. ए. होण्याचे ध्येय

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील हॉटेलमध्ये आठ तास काम करून उमेश राजाराम खोत याने बारावीच्या परीक्षेत ८०.९२ टक्के गुणांसह धवल यश मिळविले आहे. त्याचे मूळ गाव पडखंबेपैकी खोतवाडी (ता. भुदरगड) असून कोल्हापुरातील शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे.कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी उमेश याचे वडील हे गेल्या २0 वर्षांपासून कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये काम करत आहेत. त्या ठिकाणी ते राहतात. गावामध्ये दहावी, बारावीच्या शिक्षणाची सोय नसल्याने उमेश आणि त्याचा भाऊ चार वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये आले.

मिस क्लार्क हॉस्टेल आणि कोरगावकर यांच्या विनयकुमार छात्रालयात ते विनामूल्य राहू लागले. शिक्षण, जेवणाचा खर्च भागविण्यासाठी दरमहा तीन हजार रुपये पगारावर उमेश हा हॉटेलमध्ये काम करू लागला. दिवसातील चार तास कॉलेज, चार तास अभ्यास आणि आठ तास हॉटेलमध्ये काम करून त्याने बारावीच्या परीक्षेत ८०.९२ टक्के गुण मिळविले आहेत. या यशाबद्दल प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांच्यासह प्राध्यापकांनी उमेशचे अभिनंदन केले.

सी. ए. होण्याचे ध्येयशिक्षण घेताना कष्टाची लाज कधी बाळगली नाही. कोण, काय म्हणतील याकडे लक्ष दिले नाही. खोटी प्रतिष्ठाही बाळगली नाही. सी. ए. होण्याचे माझे ध्येय असल्याचे उमेश याने सांगितले.

यश डोंगराएवढे वाटतेमुलगा हॉटेलमध्ये काम करून शिकला. त्याचे यश आम्हाला डोंगराएवढे वाटत आहे. आई-वडिलांच्या परिस्थितीची त्याला जाणीव आहे. शहाजी महाविद्यालयाचे मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळाल्याने त्याला हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया वडील राजाराम यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालkolhapurकोल्हापूर