शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

उद्धव ठाकरेंनी पाठिंब्याबाबत शब्द फिरवला; राजू शेट्टींचा थेट आरोप

By राजाराम लोंढे | Published: April 08, 2024 4:20 PM

'माझ्यामुळेच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेते झालेत, हे विसरू नये'

कोल्हापूर : शिवसेनेशी गद्दारी केल्याबद्दल विद्यमान खासदारांबद्दल शिवसैनिकांमध्ये राग आहे, जर त्यांना पराभूत करायचे असेल तर राजू शेट्टींना बळ दिले पाहिजे, अशी त्यांची भावना होती. त्यातूनच उद्धव ठाकरे व आपल्या भेटी झाल्या, त्यातून सकारात्मक चर्चा सुरू असतानाच ठाकरे यांनी शब्द फिरवला. कदाचित त्यांना साखर कारखानदार भेटले असतील, अशी टीका ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. आपणाला शिवसेनेत येण्याचा सल्ला देणारे संजय राऊत हे ‘स्वाभिमानी’त येऊन शिवसेनेचे काम करणार आहेत का, असा सवालही त्यांनी केला.राजू शेट्टी म्हणाले, भाजपविरोधातील मतांमध्ये विभागणी होऊ नये, यासाठी हातकणंगलेमध्ये शिवसेनेने आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी प्रयत्न होता. मात्र, आघाडीसोबत येण्याची त्यांची अट आम्हाला मान्य नव्हती. शेवटी त्यांना ‘मशाल’ चिन्हावर लढण्याची ऑफर दिली. चळवळ संपवून मला राजकारण करायचे नसल्याने तो प्रस्ताव नाकारला. उद्धव ठाकरे यांनी पाठिंब्याबाबत शब्द दिला होता, तो त्यांनी पाळणे अपेक्षित होते. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतेपद देण्यासाठी आपण सूचक आणि छगन भुजबळ हे अनुमोदक होते. माझ्यामुळेच ते नेते झालेत, हे विसरू नये.

तुपकरांना पाठिंबा, पण प्रचार नाही

राज्यात हातकणंगले, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी येथे उमेदवार उभा करण्याचा विचार आहे. शेवटी निवडणुकांसाठी पैसे लागतात, अनेकांनी इच्छा व्यक्त केली, पण आर्थिक स्थिती पाहून निर्णय घेण्याची मोकळीक त्यांना दिली आहे. बुलढाण्यातून रविकांत तुपकर यांना पाठिंबा आहे, पण आपण हातकणंगलेत व्यस्त असल्याने प्रचारासाठी जाऊ शकत नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.‘डी.सीं.च्या मागे कोण?वंचित आघाडीकडून रिंगणात असलेले डी.सी. पाटील हे अजूनही भाजपचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांनी अद्याप राजीनामा दिला नसल्याने यामागे कोण आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

वसंतदादांचे घराणे संपवण्याचे षडयंत्रमागील लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी एक सभा घेतली असती तर ते विजयी झाले असते. पण ते सांगली जिल्ह्यात असतानाही आले नाहीत. आता जे काही चालले ते वसंतदादा यांचे घराणे संपवण्याचे षडयंत्र असल्याची टीका शेट्टी यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतlok sabhaलोकसभाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना