शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

उदगावला आरक्षणाची धास्ती

By admin | Updated: September 6, 2016 23:50 IST

यड्रावकरांचेही देव पाण्यात : जिल्हा परिषदेच्या आरक्षणानंतरच मोर्चेबांधणी

संतोष बामणे -- जयसिंगपूर --शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एस.टी.) प्रवर्ग समाजाची ९ हजार ८५३ लोकसंख्या असल्यामुळे तालुक्यातील एक मतदारसंघ अनुसूचित जाती (एस.टी.) प्रवर्गासाठी राहण्याची शक्यता आहे. हे आरक्षण उदगाव अथवा यड्राव या मतदारसंघात पडणार की काय? अशी चर्चा दोन्ही गावांत आहे. यामुळे एस.टी. प्रवर्गाचा उमेदवार शोधण्याच्या तयारीत नेतेमंडळी लागली आहेत. प्रत्यक्षात अनुसूचित जातीच्या उमेदवारांचे जातवैधता पडताळणीचे दाखले उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शिरोळमधील जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ एस.टी. प्रवर्गासाठी राखीव राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पदाचे हे आरक्षण उदगावला पडणार असल्याच्या चर्चेमुळे स्थानिक नेते उमेदवाराच्या शोधात लागले असल्याचे चित्र आहे. पूर्वीचा काँग्रेसचा दबदबा असणारा उदगाव मतदारसंघ हा जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. स्व. दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार, स्व. सा. रे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघात राजकीय घडामोडी घडत होत्या. या मतदारसंघातून १९९७ ते २००० पर्यंत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून शोभा कोळी या जिल्हा परिषद सदस्य होत्या, तर २००२ साली सर्वसाधारण गटातून राजू शेट्टींनी बाजी मारून हा मतदारसंघ ‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला ठरविला व पुढे ते आमदार, खासदार झाले. त्यानंतर २००४ मध्ये राष्ट्रवादीचे स्व. शांतिनाथ मगदूम व सावकार मादनाईक यांच्यामध्ये लढत होऊन मादनाईक यांनी ‘स्वाभिमानी’चे वर्चस्व पुन्हा दाखवून दिले. त्यानंतर २००७ मध्ये काँग्रेसच्या यशोदा कोळी यांनी बाजी मारून जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविले होते. तर २०१२ मध्ये यशोदा कोळी व सावकार मादनाईक यांच्यामध्ये लढत होऊन सावकार मादनाईक विजयी झाले. आरक्षणाचा बदलता फेर पाहता सध्या अनुसूचित जाती (एस.टी.) प्रवर्गाचे आरक्षण उदगाव, तसेच यड्रावला पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उदगाव हा मतदारसंघ सध्या ‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात उदगाव, चिंचवाड, संभाजीपूर, अर्जुनवाड, घालवाड, कनवाड, कुटवाड, हसूर अशी गावे असून, मतदारसंख्या तीस हजार आहे. यामध्ये प्रत्येक गावांत एस.टी. प्रवर्गाचा उमेदवार असून, सध्या जातपडताळणीचे दाखले नसल्यामुळे एस.टी.प्रवर्गाला अडचणी निर्माण होत आहेत. अशा जातपडताळणीमुळे कुटवाड येथील सरपंचपद रिक्तच होते. आरक्षणाचा फेर लक्षात घेता हे आरक्षण उदगाववर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जातीचे दाखले नसल्याने अडचणीसध्या शिरोळ जिल्हा परिषद मतदारसंघातील मौजे आगर हे उदगावला जोडल्याचे समजते. उदगाव मतदारसंघात एकूण नऊ गावे झाली असून, लोकसंख्या ३० हजारांहून अधिक झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात एस.टी. प्रवर्गाचे उमेदवार आहेत. मात्र, जातवैधता पडताळणी दाखले नसल्यामुळे निवडणुकीत अडचण येणार आहे. उदगावचे एस.टी. प्रवर्गाचे पोलिसपाटील पदही आरक्षणामुळे रिक्तच आहे.दाखले न्यायालयीन प्रक्रियेततालुक्यात एस.टी. प्रवर्गातील लोकसंख्या ९,८५३ इतकी आहे. मात्र, एस.टी. प्रवर्गातील नागरिकांकडे जात पडताळणीचा दाखला नसल्यामुळे अनेकांना शासनाच्या सोयी-सुविधांचा लाभ मिळत नाही. शिरोळ तालुक्यात एस.टी. प्रवर्गाची लोकसंख्या दिसते. मात्र, प्रत्यक्षात पडताळणीचे दाखले न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहेत.