शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दोन दुचाकींच्या धडकेत दोन "अविनाश" ठार, कागल-निढोरी मार्गावर झाला अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:04 IST

दोन गंभीर जखमी, आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनाला गेले होते

कागल : येथील कागल-निढोरी मार्गावर खेबवडे फाट्याला दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी आहेत. अविनाश भीमराव पाटील (वय ३२, रा. कोगील बुद्रुक, ता. करवीर) अविनाश विलास झेंडे (२८, रा. मोहरे, ता. पन्हाळा) अशी मृतांची नावे आहेत. शहाजी परीट (रा. कोगील बुद्रुक) सुरज पाटील (रा. साळशी, ता. शाहूवाडी) अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात सायंकाळी सातच्या सुमारास झाला.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अविनाश पाटील व शहाजी परीट हे दुचाकीने केंबळी या गावी जात होते, तर अविनाश झेंडे व सुरेश पाटील हे देखील दुचाकीनेच कागलकडे येत होते. ते आदमापूरला बाळूमामाच्या दर्शनाला गेले होते. खेबवडे गावाकडे जाण्यासाठी वळावयाच्या ठिकाणी या दोन्ही मोटारसायकली समोरासमोर धडकल्या. यामध्ये डोक्याला गंभीर मार लागून दोघेजण जागीच ठार झाले. व दोघे गंभीर जखमी झाले. जखमी सुरज पाटील यांना कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात, तर परीट यास कणेरी मठ येथील रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताच्या ठिकाणी खूप मोठा रक्तस्राव झाला होता. येथील ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. अविनाश पाटील हा दुचाकी गाड्या दुरुस्ती व शेतीही करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, विवाहित बहीण, चार वर्षे वयाचा एक व सहा महिन्याचा एक अशी दोन लहान मुले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Two 'Avinash' Die in Bike Collision on Kagal-Nidhori Road

Web Summary : Two young men named Avinash died in a head-on collision between two bikes on the Kagal-Nidhori road near Khebavde Phata. Two others were seriously injured in the accident that occurred around 7 PM. The deceased were identified as Avinash Patil and Avinash Zende.