भाऊसिंगजी रोडवरून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:29 IST2021-07-07T04:29:56+5:302021-07-07T04:29:56+5:30

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाऊसिंगजी रोडवरील एका बँकेच्या दारात उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लंपास केली. याबाबतची ...

Two-wheeler lamp from Bhausingji Road | भाऊसिंगजी रोडवरून दुचाकी लंपास

भाऊसिंगजी रोडवरून दुचाकी लंपास

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाऊसिंगजी रोडवरील एका बँकेच्या दारात उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लंपास केली. याबाबतची फिर्यांद योगेश वसंतराव घोडके (वय ४०, रा. वेताळ तालीम, शिवाजी पेठ) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली.

फिर्यादी घोडके यांनी आपल्या मालकीची दुचाकी भाऊसिंगजी रोडवरील एका बँकेच्या दारात दुचाकी उभी केली होती. ती अज्ञाताने चोरून नेली. याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला.

शनिवार पेठेतून घरातून दोन मोबाईल फोन लंपास

कोल्हापूर : शनिवार पेठेत उघड्या घराच्या दरवाजातून प्रवेश करीत घरातील दाेन मोबाईल फोन अज्ञाताने लांबविले. याबाबतची फिर्यांद विद्यानंद नेमिनाथ जुगळे (वय ३६, रा. शनिवार पेठ) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत दिली.

फिर्यादी सोमवारी सकाळी सात वाजता घरात देवपूजा करीत होते. तर पत्नी बाथरूममध्ये होत्या. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करीत घरातील दोन मोबाईल फोन लंपास केले. याबाबतचा गुन्हा पोलिसांत नोंद झाला.

Web Title: Two-wheeler lamp from Bhausingji Road