शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

अंबप फाट्याजवळ दोघांना लुटले --दोघेही सातारा जिल्ह्यातील

By admin | Updated: September 7, 2015 00:50 IST

चाकूहल्ल्यात एक जखमी : सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास;

पेठवडगाव : अंबप फाटा (ता. हातकणंगले) येथील रेणुका कला केंद्रात कार्यक्रम पाहण्यास आलेल्या दोघांवर अज्ञातांनी चाकूहल्ला करून त्यांच्याकडील २ लाख ३८ हजाराचा ऐवज लुटला. या हल्ल्यात नेताजी तात्याबा खुडे (वय ४९, रा. कवठे, ता. वाई, जि. सातारा) हे जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली. याबाबत पेठवडगाव पोलिसांत नोंद झाली आहे. पेठवडगाव पोलिसांनी सांगितले की, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील अंबप फाट्यानजीक रेणुका कला केंद्रात गोकुळ अष्टमीचा कार्यक्रम होता. यासाठी कवठे येथून खुडे खासगी वाहन घेऊन चालक मोहन कुचेकरसह आले होते. खुडे हे कार्यक्रम पाहण्यासाठी गेले. तर कुचेकर गाडीत थांबला. (पान ८ वर) रात्री दोनच्या सुमारास दोघे परत जाण्यासाठी कारमधून महामार्गावर आले असता निळ्या रंगाची गाडी आडवी आली. गाडीतील पाच अज्ञातांनी या दोघांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. चाकूने खुडे यांच्या हातावर वार केला. या दोघांना गाडीत घालून अंबपच्या दिशेने नेले. दरम्यान, गाडीत खुडे यांच्याकडून चोरट्यांनी चेन, हातातील कडे, अंंगठ्या असे सुमारे साडेपंधरा तोळे सोने, रोख साडेतीन हजार, घड्याळ, मोबाईल, आदी २ लाख ३८ हजार ८०० रुपयांचा ऐवज लुटला. चोरट्यांना शोधण्यासाठी परिसरात नाकाबंदी केली आहे. तपास पी.आय. धनंजय जाधव, ए.पी.आय. परशुराम कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे करीत आहेत. चोरटे परिचित ! खुडे यांनी दिलेल्या फिर्यादीत एका चोरट्याच्या तोंडावरील रुमाल ओढला असता तो तोंडओळखीचा असल्याचे म्हटले आहे. चोरटे २५ ते ३० वयोगटातील असून, ते हिंदी भाषेत बोलणारे आहेत. (प्रतिनिधी)