कारोनाचे दोन बळी, १६ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:50 IST2020-12-05T04:50:48+5:302020-12-05T04:50:48+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाने दोघांचे बळी घेतले; तर नवीन १६ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात आता केवळ ...

Two victims of Carona, 16 new patients | कारोनाचे दोन बळी, १६ नवीन रुग्ण

कारोनाचे दोन बळी, १६ नवीन रुग्ण

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाने दोघांचे बळी घेतले; तर नवीन १६ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात आता केवळ ३५५ रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांतून उपचार सुरू आहेत. कोल्हापुरात कोरोनाने आता नांगी टाकली असून, अशीच आणखी काही दिवस परिस्थिती राहिली तर तो राज्यातील ‘कोरोनामुक्त जिल्हा’ म्हणून गणला जाईल.

गेल्या २४ तासांत कोल्हापूर शहरात चार, नगरपालिका हद्दीत पाच, तर इतर जिल्ह्यांतील पाच रुग्णांची नोंद झाली. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिरोळ, हातकणंगले, आजरा तालुक्यांत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. या व्यतिरिक्त ग्रामीण भागात कोठेही रुग्ण आढळून आला नाही.

कोरोनाची साथ पूर्णत: आटोक्यात असली तरी शहरी भागात नागरिक नाकाला मास्क लावणे, सामाजिक अंतराचा नियम पाळणे, साबणाने हात स्वच्छ धुणे या गोष्टी करीत आहेत; त्यामुळे दिवाळीनंतरही जिल्ह्याला कोरोनापासून मुक्ती मिळत आहे.

Web Title: Two victims of Carona, 16 new patients