कळंबा कारागृहातून पळून गेलेल्या दोन कैदींना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 17:31 IST2021-05-25T17:28:07+5:302021-05-25T17:31:18+5:30
Crime News Kolhapur Police Jail : कळंबा मध्यवर्ती काराग्रहाच्या आपत्कालीन कारागृहातून पळून गेलेल्या दोघा कच्च्या कैद्यांना हातकणंगले जवळ शेतात पकडले. प्रतीक सुहास सरनाईक (वय 30 रा. आर के नगर, पाचगाव रोड, साई कॉलनी, कोल्हापूर), गुंडाजी तानाजी नंदीवाले (28, तमदलगे, शिरोळ जि कोल्हापूर) अशी अटक केलेल्या कैद्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाने या दोघांना मंगळवारी दुपारी अटक केली.

कळंबा कारागृहातून पळून गेलेल्या दोन कैदींना केली अटक
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती काराग्रहाच्या आपत्कालीन कारागृहातून पळून गेलेल्या दोघा कच्च्या कैद्यांना हातकणंगले जवळ शेतात पकडले. प्रतीक सुहास सरनाईक (वय 30 रा. आर के नगर, पाचगाव रोड, साई कॉलनी, कोल्हापूर), गुंडाजी तानाजी नंदीवाले (28, तमदलगे, शिरोळ जि कोल्हापूर) अशी अटक केलेल्या कैद्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाने या दोघांना मंगळवारी दुपारी अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आयटीआय मधील आपत्कालीन कारागृहात गंभीर गुन्ह्यातील न्यायालयीन बंदी असलेले प्रतीक सरनाईक व गुंडाजी नंदीवाले हे दोघे आयटीआय जवळील आपत्कालीन कारागृहात होते. दि.१४ मे ला रात्री खिडकीचे लोखंडी गज वाकवून दोघे पळून गेले होते गेले.
तब्बल अकरा दिवस पोलिसांची पथके त्यांच्या मागावर होती. कैद्यांनी कोल्हापुरातील शेंडा पार्क, पाचगाव परिसरासह कळंबा, निगवे कापशी भुदरगड, मुरगूड गडहिग्लज व कागल या परिसरात काही काळ असरा घेतला. त्यानंतर हे दोघे हातकणंगले इचलकरंजी रोडवर हातकणंगलेत शेतात लपून बसले असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शेतात जाऊन त्यांना पकडले.