चोरट्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST2021-09-14T04:30:00+5:302021-09-14T04:30:00+5:30

मलकापूर : साळशी (ता. शाहूवाडी) येथून मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ...

Two lakh worth of property seized from the thief | चोरट्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

चोरट्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर : साळशी (ता. शाहूवाडी) येथून मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोटारसायकलसह वापरलेली रिक्षा असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी किरण सोनवणे (वय ३२, रा. प्राध्यापक कॉलनी, ३२ शिराळा) व राजू बशीर सय्यद (४२, रा. बत्तीस शिराळा) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साळशी येथील नीलेश महादेव मगदूम यांची मोटारसायकल दोन दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने चोरली होती. हवालदार संभाजी पाटील यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहिती व सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करून सोनवले व राजू बशीर सय्यद यांना पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल उत्तम भुरूगडे, बाबासो चौगुले, शिवाप्पा पाटील, प्रदीप पाटील, अरविंद वरुटे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.

Web Title: Two lakh worth of property seized from the thief