Kolhapur: उदगाव येथे अपघातात चिमुकलीसह दोघे ठार, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:01 IST2025-02-10T12:01:09+5:302025-02-10T12:01:24+5:30

जयसिंगपूर : दोन चारचाकी व मोपेड यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या ...

Two including a toddler killed, three injured in accident in Udgaon Kolhapur | Kolhapur: उदगाव येथे अपघातात चिमुकलीसह दोघे ठार, तिघे जखमी

Kolhapur: उदगाव येथे अपघातात चिमुकलीसह दोघे ठार, तिघे जखमी

जयसिंगपूर : दोन चारचाकी व मोपेड यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात अडीच वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव (ता. शिरोळ) येथील जुन्या बिल्चिंग कारखान्याजवळ हा अपघात झाला.

श्रीशा सुरेश शिंदे (वय अडीच वर्षे मूळ रा. जांभळे मळा, जयसिंगपूर सध्या रा. सांगली) व बंदेश दशरथ उळागड्डे (वय ५१, रा. कलबुर्गी कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत. अपघाताची नोंद करण्याचे काम पोलिसांत सुरू होते.

याबाबत माहिती अशी, महामार्गावरील उदगाव येथील जुन्या बिल्चिंग कारखान्याजवळ दोन चारचाकी वाहने व मोपेड या तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात श्रीशा शिंदे व बंदेश उळागड्डे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुरज महादेव शिदे (वय ३२, रा. जयसिंगपूर, सध्या रा.सांगली), शिवाणी सूरज शिंदे, (२३, रा. जयसिंगपूर सध्या रा. सांगली), सौरभ संजय शिंदे (२४ रा. जयसिंगपूर) हे जखमी झाले आहेत.

घटनास्थळी बघ्यांची मोठे गर्दी केल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिस व नागरिकांच्या मदतीने जखमींना जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले. मृतांवर शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

Web Title: Two including a toddler killed, three injured in accident in Udgaon Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.