इचलकरंजीत केबल चोरणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:31 IST2021-09-16T04:31:15+5:302021-09-16T04:31:15+5:30

इचलकरंजी : इलेक्ट्रिकल केबलची चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. विकास राजू लोखंडे (वय २७) व राजू ...

Two cable thieves arrested in Ichalkaranji | इचलकरंजीत केबल चोरणाऱ्या दोघांना अटक

इचलकरंजीत केबल चोरणाऱ्या दोघांना अटक

इचलकरंजी : इलेक्ट्रिकल केबलची चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. विकास राजू लोखंडे (वय २७) व राजू उर्फ फकीर गजानन थोरात (३९, दोघे रा. धारवट झोपडपट्टी, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून इलेक्ट्रिकल केबल व एक मोटारसायकल असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत माहिती अशी, येथील राधामोहन प्रोसेसर्समधून इलेक्ट्रिकल केबलची चोरी झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू होता. पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना विकास लोखंडे व राजू थोरात हे मोटारसायकलीवरून संशयास्पदरीत्या प्लास्टिकच्या बारदानामधून काहीतरी घेऊन जाताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांच्याकडून ३५ हजार रुपयांची इलेक्ट्रिकल केबल व २५ हजार रुपयांची हीरो स्प्लेंडर प्लस मॉडेलची सिल्व्हर रंगाची मोटारसायकल (एमएच ०९ - ईडी ९४६०) असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Web Title: Two cable thieves arrested in Ichalkaranji