शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद, दोघेजण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 14:14 IST

CoronaVIrus Police Kolahpur : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या विषाणूमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती कठीण होत चालली आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी उपयोगी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जिल्ह्यात जाणवत असतानाच या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा छडा कोल्हापूर पोलिसांनी लावला असून दोनजणांना जेरबंद केले आहे. पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा जप्त केला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद तिघांची टोळी उघड, दोघेजण ताब्यात, इंजेक्शनचा मोठा साठा जप्त

कोल्हापूर : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या उद्रेकमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती कठीण होत चालली आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी उपयोगी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जिल्ह्यात जाणवत असतानाच या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा छडा कोल्हापूर पोलिसांनी लावला असून दोनजणांना जेरबंद केले आहे. पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा जप्त केला आहे.कोल्हापुरात साडेपाच हजार रुपयाचे हे इंजेक्शन काळ्याबाजारात तब्बल प्रत्येकी अठरा हजार रुपयांना एक याप्रमाणे जादा दराने विक्री करणारी टोळी कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जेरबंद केली आहे. योगीराज राजकुमार वाघमारे ( रा. न्यू शाहुपुरी, सासणे मैदान, कोल्हापूर, मूळ गाव- मोहोळ, जि. सोलापूर) व पराग विजयकुमार पाटील (रा. कसबा बावडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या अकरा बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या टोळीतील आणखीन एका साथीदाराचे नाव निष्पन्न झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.कोरोना महामारीच्या काळात जीवनदायी ठरलेल्या रेमडेसीवीर या जीवन रक्षक इंजेक्शनचा कोल्हापूर जिल्ह्यात तुटवडा आहे. लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन रेमडेसीवीर इंजेक्शन काळ्याबाजारात जादा दराने विक्री करणारी टोळी कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कोल्हापुरात सासणे मैदान परिसरातील "मणुमाया" या इमारतीच्या तळमजल्यावर छापा टाकून योगीराज वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विक्री करण्यासाठी कब्जात बाळगलेल्या रेमडेसिवीर या औषधाच्या तीन बाटल्या मिळून आल्या.

अधिक चौकशी करता त्याने ती औषधे पराग पाटील यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. पाटील हा रेमडेसिविर औषधाच्या आणखीन बाटल्या घेऊन येणार असल्याची माहिती योगिराजने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पराग पाटील यालाही अटक केली. त्याच्याकडे रेमडेसिविर या औषधाच्या आठ बाटल्या मिळून आल्या. पोलिसांनी एकूण अकरा बाटल्या जप्त केल्या.

अवघ्या साडेपाच हजार रुपये किमतीला एक मिळणारी ही औषधे काळ्याबाजारात अठरा हजार रुपयांना एक याप्रमाणे विक्री करत असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, अटक केलेला योगीराज वाघमारे हा सावर्डे (ता. हातकणंगले) येथील बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे, तर पराग पाटील हा एका मेडीकलमध्ये सेल्समन म्हणून नोकरीस आहेत. दरम्यान आणखीन एकाचे नाव निष्पन्न झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी