शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
4
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
5
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
6
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
7
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
9
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
10
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
11
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
12
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
13
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
14
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
15
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
16
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
17
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
18
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
19
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
20
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस जणांची कसून चौकशी !

By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST

कऱ्हाडातील टोळीयुद्ध : संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

कऱ्हाड : टोळीयुद्धातून झालेल्या बबलू माने व बाबर खानच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. पोलिसांनी सुमारे २५ जणांकडे कसून चौकशी केली असून, त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान, कऱ्हाड हे संघटित गुन्हेगारीचे केंद्र बनत असल्याचे सोमवारच्या घटनेतून स्पष्ट होत असून, संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करणार असल्याचे व त्याद्वारे गुन्हेगारांचे कंबरडे मोडणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शहरातील मंडईमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास टोळीयुद्धाचा भडका उडाला. सल्या चेप्या गोळीबार प्रकरणात हात असणाऱ्या बबलू माने याच्यावर बाबर खानने गोळ्या झाडल्या. बबलू माने हा त्याच्या घरापासून काही अंतरावर वर्तमानपत्र वाचत बसला असताना बाबर खान त्याठिकाणी आला. त्याने त्याच्याजवळील पिस्तुलातून बबलूला गोळ्या घातल्या. त्यानंतर त्याठिकाणी आलेली बबलूची आई अनुसया यांच्यावरही त्याने गोळ्या झाडल्या. या गोळीबारात बबलूचा मृत्यू झाला तर त्याची आई गंभीर जखमी झाली. घटनेनंतर जमावाने बाबर खानला दगडाने ठेचून ठार मारले. या भयानक घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. मंगळवारी दिवसभर शहरात तणावपूर्ण शांतता होती. याप्रकरणी कऱ्हाड उपविभागातील पोलीस अधिकारी या घटनेच्या तपासाभोवती आहेत. तसेच सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला आहे. सोमवारपासून पोलिसांनी दोन्ही गटातील अनेकांकडे चौकशी केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे २५ जणांची कसून चौकशी झाली. त्यातून काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांची वेगवेगळी पथके तपासासाठी सांगली व कोल्हापूरला पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, कऱ्हाडात अद्याप कडक पोलीस बंदोबस्त आहे. (प्रतिनिधी) बाबरने सहा गोळ्या झाडल्या बबलू ज्याठिकाणी बसला होता, त्याठिकाणी पोहोचल्यानंतर बाबर खानने दोन गोळ्या बबलूवर झाडल्या. त्यानंतर प्रतिकार करणाऱ्या अनुसया माने यांच्यावरही बाबरने दोन गोळ्या झाडल्या. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दहशत माजविण्यासाठी आणखी दोन गोळ्या झाडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पिस्तुल ९ एम.एम.चे बाबरने गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल पोलिसांनी सोमवारीच घटनास्थळावरून हस्तगत केले आहे. संबंधित पिस्तुल ९ एम. एम.चे आहे. मात्र, ते परदेशी बनावटीचे आहे की नाही, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. पिस्तुल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर ती माहिती कळू शकेल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिली.