शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

बारा दिवसांत पाऊण लाख नागरिकांचे पोट भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST

कोल्हापूर : संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे गरिबांना उपाशीपोटी राहावे लागू नये यासाठी मोफत सुरू झालेल्या शिवभोजनाचा गेल्या १२ दिवसांत ७४ ...

कोल्हापूर : संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे गरिबांना उपाशीपोटी राहावे लागू नये यासाठी मोफत सुरू झालेल्या शिवभोजनाचा गेल्या १२ दिवसांत ७४ हजार २६२ नागरिकांनी लाभ घेतला आहे. थाळ्यांची संख्या वाढविलेल्या दिवसापासूनची ही आकडेवारी असून, दिवसाला सरासरी पाच हजार ७०० पर्यंत थाळ्यांचे वितरण होत आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमाचा गोरगरिबांना अत्यंत चांगला उपयोग होत असून, त्यांची उपासमार टळली आहे.

एप्रिल महिन्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने राज्य शासनाने १४ तारखेला संचारबंदी लागू केली, त्याच दिवशी गरिबांसाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र थाळ्यांची संख्या कमी पडू लागल्याने शासनाने १६ तारखेला अध्यादेश काढून १७ तारखेपासून केंद्रांवरील वितरणाच्या दीडपट थाळ्यांची संख्या वाढवण्यात आली. वेळेतदेखील एक तासाने वाढ करून चार वाजेपर्यंत करण्यात आली. ज्या केंद्रांना २०० थाळ्यांची मान्यता होती ती वाढून ३०० इतकी झाली. पूर्वी जिल्ह्याला दिवसाला ४ हजार थाळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते वाढून सहा६ हजार करण्यात आले.

थाळ्यांची संख्या वाढवण्यात आली असली तरी लाभार्थ्यांअभावी रोज सहा हजारांऐवजी पाच हजार ६०० ते ५ हजार ८०० इतक्या थाळ्यांचे वितरण होत आहे. गेल्या १२ दिवसांत जिल्ह्यातील सर्व ३७ केंद्रांवरून ७४ हजारांहून अधिक नागरिकांनी या शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.

---

तालुकानिहाय केंद्रांची संख्या

कोल्हापूर शहर : ९

हातकणंगले : ५

राधानगरी : ३

शिरोळ : ३

गडहिंग्लज : ३

पन्हाळा : ३

शाहूवाडी : २

गगनबावडा : २

कागल : २

चंदगड : २

आजरा : १

करवीर : १

भुदरगड : १

एकूण केंद्रसंख्या : ३७

रोज होणारे वितरण : ५ हजार ७०० ते ८००

--

मोबाईल आणि शिवभोजन...

मोबाईल क्रमांक नसेल तर शिवभोजन देऊच नये असे सरकारचे आदेश नाहीत; परंतु या व्यवहारात पारदर्शकता राहावी व शासनाने दिलेले जेवण गोरगरीब जनतेच्या मुखातच जावे यासाठी केंद्रचालकांना मोबाईल क्रमांकाच्या बाबतीत सक्त सूचना दिल्या असल्याचे जिल्हा पुर‌वठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी सांगितले. त्याबाबत ‘लोकमत’कडे लोकांकडून तक्रार आली होती. गोरगरिबांकडे मोबाईल नसतो; मग त्यांना जेवण मिळणार नाही का? अशी विचारणा करण्यात आली होती.