शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

मंडलिक कारखान्याचा साडे बारा टक्के उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:24 IST

म्हाकवे : हमिदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता करण्यात आली. यावेळी उत्पादित १लाख ०७ ...

म्हाकवे : हमिदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता करण्यात आली. यावेळी उत्पादित १लाख ०७ हजार साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले, संचालकांच्या हस्ते करण्यात आले.

या हंगामामध्ये १२८ दिवसांत ५ लाख ४०हजार ८०१ मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन ६ लाख ७७ हजार क्विंटल साखर पोती उत्पादन झाले. यंदा १२.५१ टक्के इतका साखर उतारा मिळाला आहे. यंदा कार्यक्षेत्रातून ४ लाख १ हजार ३३० मेट्रिक टन तर गेटकेनेमधून ५६ हजार ९२५ व कर्नाटकमधून ८२ हजार ५४५ मेट्रिक टन इतका ऊस गळीतासाठी उपलब्ध झाला .को-जनरेशन प्रकल्पातून एकूण ३ कोटी ७४ लाख ६२ हजार ९४९ युनिट वीजनिर्मिती झाली. त्यापैकी २ कोटी २० लाख ०५ हजार ६५३ इतकी युनिट वीज ही महावितरण कंपनीस निर्यात केली. एक कोटी ५२ लाख ५८ हजार २९६ युनिटस् कारखान्यासाठी वापरण्यात आली.

लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे आणि अध्यक्ष संजय मंडलिक यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी शेतकरी, कंत्राटदार, ऊसतोड मजूर यांच्या सहकार्यामुळे हा हंगाम यशस्वी झाला. याबाबत बंडोपंत चौगुले यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

संचालक प्रकाश पाटील व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती पाटील या उभयंतांच्या हस्ते सत्यनारायण पूजा बांधण्यात आली. संचालक आप्पासो तांबेकर, शहाजी यादव, मारुती काळूगडे, मसू पाटील, दतात्रय चौगले, दत्तात्रय सोनाळकर, नंदकुमार घोरपडे, संचालिका राजश्री चौगले, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.

२२ मंडलिक

सदाशिवराव मंडलिक कारखान्यातील साखर पोत्यांचे पूजन करताना उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले. यावेळी संचालक उपस्थित होते.