शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमधील उद्योग अडचणीत

By admin | Updated: September 1, 2015 20:45 IST

कामगारांचा प्रश्न गंभीर : तालुक्यातील औद्योगिक वसाहती मंदीच्या चक्रव्यूहात

संतोष बामणे -जयसिंगपूर शिरोळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक उद्योग मंदीच्या चक्रव्युहात अडकले असून, या परिसरातील अनेक उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे उद्योगावर अवलंबून असणारे व्यवसायिक व कामगार आर्थिक अरिष्टात सापडला असून, कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. इचलकरंजीतील संपाचा परिणामही शिरोळ तालुक्यात झाला आहे.तालुक्यात ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहत, छ. शाहू महाराज औद्योगिक वसाहत व पार्वती औद्योगिक वसाहत असून, याठिकाणी अनेक मोठे व लघु उद्योग आहेत. यामध्ये शेती उत्पादनावर आधारित, कापड उद्योग, मशिनरी, अॉटो पार्ट असे उद्योग आहेत. तसेच जिल्ह्यातील व परराज्यातील अनेक कामगार येथे काम करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मंदीचे सावट आल्याने विविध उद्योग अडचणीत सापडले आहेत. शंभरहून अधिक छोट्या-मोठ्या उद्योगांना काम नसल्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.वसाहतीमध्ये छोटे-मोठे उद्योग असून, सर्व व्यवसाय एकमेकांवर अवलंबून आहेत. येथील माल सातासमुद्रापार पोहोचला आहे. तालुक्यामध्ये कामगारांची आर्थिक घडी बसविणाऱ्या या औद्योगिक वसाहतीला अवकळा लागली आहे. शासनाने वीज दरवाढ केल्याने उद्योगांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथील उद्योग परराज्यात स्थलांतरीत होत आहेत. जागतिक मंदीमुळे शिरोळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये उत्पादित होणारे स्पेअरपार्टचे काम कमी झाल्यामुळे छोटे उद्योग बंद पडत आहेत. यामुळे यावर अवलंबून असणारे घटक आर्थिक अरिष्टात सापडले आहेत. शासनाने वीज बिलाबाबत लवकर तोडगा काढला पाहिजे, अन्यथा उद्योग इतरत्र स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.- दिलीप पाटील-कोथळीकर, अध्यक्ष, ल. क. अकिवाटे वसाहतऔद्योगिक क्षेत्रासाठी सध्या असणारी वीज बिलाची आकारणी न परवडणारी आहे. शासनाने वीज बिलाची दरवाढ कमी करून औद्योगिक वसाहतींना चालना देण्याची गरज आहे. उद्योग टिकले तरच कामगार टिकतील, अन्यथा बेरोजगारीची समस्या वाढण्याची शक्यता आहे.- डॉ. अशोकराव माने, अध्यक्ष,  शाहू औद्योगिक वसाहतइचलकरंजी येथील कामगारांच्या संपाचा यड्रावमधील पार्वती इंडस्ट्रीजवरही परिणाम झाला आहे. वस्त्रोद्योग हे एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे उद्योगही बंद पडले आहेत. यामुळे कामगार व मालक दोघेही भरडे जात असून, यावर तोडगा काढण्याची गरज आहे.- सचिन मगदूम, यंत्रमाग उद्योजक, यड्राव