लढा मराठा आरक्षणाचा... हात मदतीचा; कोल्हापुरातून आज ट्रकभर साहित्य मुंबईकडे रवाना होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:35 IST2025-09-01T12:34:49+5:302025-09-01T12:35:19+5:30

मदतीचा ओघ वाढला

Truckloads of materials will be sent from Kolhapur for the protesters in Mumbai for Maratha reservation | लढा मराठा आरक्षणाचा... हात मदतीचा; कोल्हापुरातून आज ट्रकभर साहित्य मुंबईकडे रवाना होणार 

लढा मराठा आरक्षणाचा... हात मदतीचा; कोल्हापुरातून आज ट्रकभर साहित्य मुंबईकडे रवाना होणार 

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तळ ठोकून बसलेल्या आंदोलनकर्त्यांसाठी कोल्हापुरात ९ नंबर शाळा, राजारामपुरी दहावी गल्ली येथे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये कोरडा खाऊ, विविध प्रकारच्या चटण्या, लोणची, मीठ, साखर, छत्री, रेनकोट या स्वरूपात मदत एकत्रित केली जाणार आहे. सोमवारी दुपारी साहित्य भरलेला ट्रक मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आली.

मराठा बांधव मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे या हजारो मराठा बांधवांच्या खाण्या-पिण्याची सोय व्हावी, यासाठी हे मदत केंद्र येथे सुरू करण्यात आले आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तू मदतीच्या स्वरूपात स्वीकारून त्या आंदोलनस्थळी पोहोच करण्यात येणार आहेत. मदतीचा ओघ चांगला असून, आज दुपारपर्यंत येणारी मदत तातडीने मुंबईला पाठवली जाणार आहे. आपण देत असलेल्या वस्तू व्यवस्थित पॅक करून द्याव्यात, असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

अनवाणी पायांनी सायकलीवरून मुंबईला रवाना

बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील संपतराव खाके यांनी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्धार केला आहे. ते अनवाणी पायांनी सायकलीवरून मुंबईला रवाना झाले आहेत.

खालील स्वरूपात मदत करू शकता..

कोरडा खाऊ : बिस्कीट, चिवडा, फरसाण, खाकरा यासारखे लवकर खराब न होणारे पदार्थ.
विविध प्रकारच्या चटण्या, लोणची, मीठ, साखर, छत्री, रेनकोट
चप्पल न घालता खाके निघाले मुंबईला

Web Title: Truckloads of materials will be sent from Kolhapur for the protesters in Mumbai for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.