‘यात्री निवास’ने जपली बांधीलकी

By Admin | Updated: December 6, 2014 00:28 IST2014-12-06T00:06:24+5:302014-12-06T00:28:58+5:30

कुरुंदवाडातील व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी विनामूल्य खोल्या

'Traveler residences' are bound by | ‘यात्री निवास’ने जपली बांधीलकी

‘यात्री निवास’ने जपली बांधीलकी

गणपती कोळी - कुरुंदवाड येथील तबक उद्यानात १० ते १४ डिसेंबरअखेर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी राज्यभरातून येणाऱ्या शेकडो खेळाडूंच्या निवासासाठी तीर्थक्षेत्र नृसिंहवाडीतील यात्री निवासी व्यावसायिकांनी कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता केलेली सोय कौतुकास्पद ठरत आहे.
येथील श्री स्पोर्टस् क्रीडा संस्थेला ४६ व्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा व्हॉलीबॉल अजिंक्य स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. तब्बल बावीस वर्षांनंतर पश्चिम महाराष्ट्राला यजमानपद मिळाले आहे.
क्रीडा मैदान, प्रेक्षकांची व्यवस्था, याबरोबरच खेळाडूंच्या निवासाची सोय प्रथम महत्त्वाची असते. राज्यातील ३८ जिल्ह्यांतून ३८ पुरुष संघ व ३६ महिला संघ या स्पर्धेत भाग घेणार असून, सुमारे १२०० खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक, पंच, निमंत्रितांची राहण्याची व्यवस्था महत्त्वाची होती. त्यामुळे संयोजकांनी महाराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या नृसिंहवाडीतील सुमारे ११८ यात्री निवासी खोल्या आरक्षित केल्या आहेत. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटकांतून दररोज यात्रेकरू येत असतात. त्यामुळे येथील यात्रीनिवासांना चांगली गर्दी असते. हेच नृसिंहवाडीकरांचे उत्पादनाचे मुख्य साधन आहे; मात्र स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धेत आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून कोणताही मोबदला अथवा अट न घालता, पाच दिवस उत्पन्नाचा विचार न करता दिल्याने संयोजकांना प्रोत्साहन मिळाले आहे.

तयारीला वेग
येथे १० ते १४ डिसेंबर या काळात होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेची तयारी वेगाने सुरु असून मैदान, प्रेक्षक गॅलरी ,खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था करण्यात संयोजक व्यस्त आहेत

Web Title: 'Traveler residences' are bound by