दैव बलवत्तर म्हणून ट्रॅव्हलर बस दरीत कोसळताना वाचली; १७ प्रवासी थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 22:16 IST2022-06-27T22:15:59+5:302022-06-27T22:16:50+5:30
दैव बलवत्तर म्हणून ट्रॅव्हलमधील सतरा प्रवासी बचावले.

दैव बलवत्तर म्हणून ट्रॅव्हलर बस दरीत कोसळताना वाचली; १७ प्रवासी थोडक्यात बचावले
आंबा: भुरकट पाऊस आणि दाट धुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो ट्रॅव्हलर काल रविवारी रात्री दहाच्या सुमारास खोल दरीत जाता जाता वाचली. दैव बलवत्तर म्हणून ट्रॅव्हलमधील सतरा प्रवासी बचावले.आंबा घाटातील गायमुख जवळील वळणावरून गाडीची डावी बाजू कठडा तोडून पुढील बाजू दरीकडे झुकली नि दरीच्या काठावर लटकली. प्रसंगसावधान राखून सतराही प्रवाश्यांनी गाडीतून बाहेर पडले.नि सुटकेचा निःश्वास टाकला.
दरम्यान घाटातील बांधकामावरील जेसीबी ने गाडी ओढून बाहेर काढली. सृष्टि टूर अँन्ड ट्रॅव्हल्स (एम.एच.४६,बी.एफ.७४२७) कर्जतहून कोल्हापूर मार्गे गणपतीपुळ्याला निघाली होती.दाट धुके असल्याने हा अपघात घडला. संरक्षण कठडा असल्याने ही गाडी वरतीच लटकली. जेसीबी चालक अशोक जाधव यांचे योगदान लाभले.