शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

देवमामांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणला; नितीन कडूकर पुणे विभाग व कोल्हापूर जिल्ह्यात पहिला ट्रान्सजेंडर 'पीएसआय' झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:39 IST

श्री. क्षेत्र बाळूमामा मंदिर परिसरात जोगवा मागून पांडुरंग मारुती गुरव (देवमामा) यांनी तृतीयपंथी नितीन राजाराम कडूकर या शिष्याला घडवले

मोहन सातपुते उचगाव: श्री. क्षेत्र बाळूमामा मंदिर परिसरात जोगवा मागून समाजातील दुर्लक्षित घटकाला दानधर्म करणारे पांडुरंग मारुती गुरव (देवमामा) यांनी तृतीयपंथी नितीन राजाराम कडूकर या शिष्याला घडवले. लहानाचे मोठे करत पदवीधर करून पोलिस उपनिरीक्षक बनविले.

चंदगड पैकी राजगोळी गावचे देवमामा रहिवाशी आहेत. त्यांचे शिक्षण डी.एड झाले आहे. शिक्षकांची नोकरी करून मुलांच्या मनात संस्काराची बीजे रोवायची होती. पण शिक्षक नोकरीसाठी वशिला नसल्याने त्यांना नोकरी पासून वंचित राहावे लागले. देवदासी समुदायाकडे त्यांची पाहूले पडली आणि जोगव्यान त्यांना जगवले. पण, नितीन या शिष्याला त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शासनाने पोलिस भरती प्रक्रियेच्या अर्जात लिंग ओळखमध्ये पुरुष, स्त्री आणि इतर असा नवा कॉलम वाढवला. त्याचा फायदा घेत नितीननी कोल्हापूरमधून पोलिस कॉन्स्टेबल व पोलिस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली. १५० पैकी १४५ गुण त्यांना मिळाले आणि पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत पुणे विभागात व कोल्हापूर जिल्ह्यात पहिला ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) पीएसआय बनल्याचा बहुमान त्यांनी पटकाविला आहे. लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम लागणार आहे. या प्रशिक्षणासाठी नितीन सज्ज झाले आहेत.

२०२१ पासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. ट्रान्सजेंडरसाठी आरक्षणचा निर्णय झाला. पोलिस भरती अर्जात लिंग ओळखमध्ये पुरुष, स्त्री आणि इतर असा नवा कॉलम वाढवला. त्यामुळे परीक्षा दिली आणि १५०/१४५ गुण मिळाले. - नितीन कडूकर (तृतीयपंथी) 

शिक्षण डी एड झालं.मला पुढे शिक्षक व्हायचं होते. पण समुदायाची सेवा करण्याची संधी बाळूमामानी दिली. इथं जोगवा मागून गुजराण करते. तर आलेल्या जोगव्यातून दानधर्म करते. हे पुण्याईचे काम आहे. समाजाला दिशा देण्यासाठी यापुढेही चांगलं काम करणार आहे. - पांडुरंग गुरव (देवमामा), आदमापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Devmamas's Guidance: Nitin Kadukar Becomes First Transgender PSI in Pune

Web Summary : With Devmama's support, Nitin Kadukar, a transgender individual, achieved success. Overcoming obstacles, Kadukar secured the position of Police Sub-Inspector (PSI) in Pune division and Kolhapur district, marking a significant milestone.