देवमामांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणला; नितीन कडूकर पुणे विभाग व कोल्हापूर जिल्ह्यात पहिला ट्रान्सजेंडर 'पीएसआय' झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:39 IST2026-03-24T13:38:39+5:302026-03-24T13:39:40+5:30

श्री. क्षेत्र बाळूमामा मंदिर परिसरात जोगवा मागून पांडुरंग मारुती गुरव (देवमामा) यांनी तृतीयपंथी नितीन राजाराम कडूकर या शिष्याला घडवले

Transgender Nitin Rajaram Kadukar becomes the first PSI in Pune division and Kolhapur district | देवमामांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणला; नितीन कडूकर पुणे विभाग व कोल्हापूर जिल्ह्यात पहिला ट्रान्सजेंडर 'पीएसआय' झाला

देवमामांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणला; नितीन कडूकर पुणे विभाग व कोल्हापूर जिल्ह्यात पहिला ट्रान्सजेंडर 'पीएसआय' झाला

मोहन सातपुते 

उचगाव: श्री. क्षेत्र बाळूमामा मंदिर परिसरात जोगवा मागून समाजातील दुर्लक्षित घटकाला दानधर्म करणारे पांडुरंग मारुती गुरव (देवमामा) यांनी तृतीयपंथी नितीन राजाराम कडूकर या शिष्याला घडवले. लहानाचे मोठे करत पदवीधर करून पोलिस उपनिरीक्षक बनविले.


चंदगड पैकी राजगोळी गावचे देवमामा रहिवाशी आहेत. त्यांचे शिक्षण डी.एड झाले आहे. शिक्षकांची नोकरी करून मुलांच्या मनात संस्काराची बीजे रोवायची होती. पण शिक्षक नोकरीसाठी वशिला नसल्याने त्यांना नोकरी पासून वंचित राहावे लागले. देवदासी समुदायाकडे त्यांची पाहूले पडली आणि जोगव्यान त्यांना जगवले. पण, नितीन या शिष्याला त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले. 

शासनाने पोलिस भरती प्रक्रियेच्या अर्जात लिंग ओळखमध्ये पुरुष, स्त्री आणि इतर असा नवा कॉलम वाढवला. त्याचा फायदा घेत नितीननी कोल्हापूरमधून पोलिस कॉन्स्टेबल व पोलिस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली. १५० पैकी १४५ गुण त्यांना मिळाले आणि पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत पुणे विभागात व कोल्हापूर जिल्ह्यात पहिला ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) पीएसआय बनल्याचा बहुमान त्यांनी पटकाविला आहे. लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम लागणार आहे. या प्रशिक्षणासाठी नितीन सज्ज झाले आहेत.

२०२१ पासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. ट्रान्सजेंडरसाठी आरक्षणचा निर्णय झाला. पोलिस भरती अर्जात लिंग ओळखमध्ये पुरुष, स्त्री आणि इतर असा नवा कॉलम वाढवला. त्यामुळे परीक्षा दिली आणि १५०/१४५ गुण मिळाले. - नितीन कडूकर (तृतीयपंथी)
 

शिक्षण डी एड झालं.मला पुढे शिक्षक व्हायचं होते. पण समुदायाची सेवा करण्याची संधी बाळूमामानी दिली. इथं जोगवा मागून गुजराण करते. तर आलेल्या जोगव्यातून दानधर्म करते. हे पुण्याईचे काम आहे. समाजाला दिशा देण्यासाठी यापुढेही चांगलं काम करणार आहे. - पांडुरंग गुरव (देवमामा), आदमापूर

Web Title : देवमामा का मार्गदर्शन: नितिन कडूकर पुणे में पहले ट्रांसजेंडर पीएसआई बने

Web Summary : देवमामा के समर्थन से, नितिन कडूकर, एक ट्रांसजेंडर व्यक्ति, ने सफलता हासिल की। बाधाओं को पार करते हुए, कडूकर ने पुणे डिवीजन और कोल्हापुर जिले में पुलिस उप-निरीक्षक (पीएसआई) का पद हासिल किया, जो एक महत्वपूर्ण मील का पत्थर है।

Web Title : Devmamas's Guidance: Nitin Kadukar Becomes First Transgender PSI in Pune

Web Summary : With Devmama's support, Nitin Kadukar, a transgender individual, achieved success. Overcoming obstacles, Kadukar secured the position of Police Sub-Inspector (PSI) in Pune division and Kolhapur district, marking a significant milestone.