'सारथी' मार्फत स्थानिक पातळीवरील उद्योगांचे प्रशिक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST2021-08-27T04:27:07+5:302021-08-27T04:27:07+5:30

कोल्हापूर. ' सारथी ' संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये ज्या त्या ...

Training of local level industries should be imparted through 'Sarathi' | 'सारथी' मार्फत स्थानिक पातळीवरील उद्योगांचे प्रशिक्षण द्यावे

'सारथी' मार्फत स्थानिक पातळीवरील उद्योगांचे प्रशिक्षण द्यावे

कोल्हापूर.

' सारथी ' संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये ज्या त्या जिल्ह्यातील स्थानिक गुणवैशिष्ट्यांसह जे उद्योग चालतात, त्याचेही तांत्रिक प्रशिक्षण द्यावे. जेणेकरून असे छोटे-मोठे उद्योग करणाऱ्या तरुण व्यावसायिकांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेंतर्गत कर्जपुरवठा करून त्यांना स्वावलंबी बनवता येईल, असा प्रस्ताव पुणे येथे सारथी संस्थेमधील बैठकीत समरजित घाटगे यांनी दिला. उपस्थित सदस्यांनी त्यास सकारात्मकता दर्शवली असून हा विषय बोर्डापुढे ठेवू, असे सांगितले. सारथी संस्थेने मान्यता दिली तर याची सुरुवात कोल्हापुरातून करावी, अशी विनंती समरजित घाटगे यांनी केली. या बैठकीस अध्यक्ष अजित निंबाळकर, संचालक मधुकर कोकाटे, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, निबंधक अशोक पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नीता नागर, कौशल्य विकास सहसंचालक अनुपमा पवार, प्रकल्प संचालिका ज्योत्स्ना शिंदे, डॉ.श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी घाटगे म्हणाले की, आज व्यवसायासाठी अनेक तरुण मुले पुढे येत आहेत; पण त्यांना अचूक असे तांत्रिक प्रशिक्षण नाही. याच विषयाच्या अनुषंगाने आम्ही घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २२ सहकारी बँकांना एकत्र करून समन्वय कक्ष स्थापन करून प्रोत्साहन देत आहोत.

फोटो ओळी : पुणे येथे सारथीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर व सदस्यांशी समरजित घाटगे यांनी चर्चा केली.

Web Title: Training of local level industries should be imparted through 'Sarathi'