Kolhapur News: चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली ओढ्यात कोसळली, चालक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 16:51 IST2023-02-09T16:50:33+5:302023-02-09T16:51:51+5:30
प्रकाश पाटील कोपार्डे : बालिंगा ता. करवीर गावच्या पूर्वेला असलेल्या कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर ओढ्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्राँली ...

Kolhapur News: चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉली ओढ्यात कोसळली, चालक ठार
प्रकाश पाटील
कोपार्डे : बालिंगा ता. करवीर गावच्या पूर्वेला असलेल्या कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर ओढ्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्राँली थेट ओढ्यात कोसळल्याने चालक ठार झाला. सुरेश सुभाष जगताप (वय ३०) रा. सावर्डे दु। असे मृत चालकाचे नाव आहे. अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. ही घटना आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सावर्डे दु। येथील दिनकर कारंडे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर सुरेश सुभाष जगताप हा चालक म्हणून काम करत होता. सकाळ तो वीट व्यवसायासाठी कसवा वाळू आणण्यासाठी सावर्डे दु।हून कोल्हापूरकडे निघाला होता. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगेच्या पूर्वेला असणाऱ्या छोट्या मोहरीवर तो आला. यावेळी समोरील वाहनाला ओव्हरटेक करत असताना त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला.
यात ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल ओढ्यात कोसळला. चालक जगतापने ट्रॅक्टरवरून उडी घेत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो थेट ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली आल्याने चिरडला गेला. यात तो जागीच ठार झाला. करवीर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृत चालक सुरेशच्या पश्चात आई-वडील, दोन विवाहित बहिणी आहेत.