अश्लील व्हिडीओ व्हॉट्स अ‍ॅपवर टाकून युवतीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 10:55 IST2019-03-14T10:54:25+5:302019-03-14T10:55:41+5:30

कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करून अश्लील फोटो व व्हिडीओ मित्रांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर टाकून मारहाण केल्याप्रकरणी युवकावर ...

Torture on youth, crime against youth, pornographic videos over the app | अश्लील व्हिडीओ व्हॉट्स अ‍ॅपवर टाकून युवतीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा

अश्लील व्हिडीओ व्हॉट्स अ‍ॅपवर टाकून युवतीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा

ठळक मुद्देअश्लील व्हिडीओ व्हॉट्स अ‍ॅपवर टाकून युवतीवर अत्याचार राजारामपुरी पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा

कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करून अश्लील फोटो व व्हिडीओ मित्रांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर टाकून मारहाण केल्याप्रकरणी युवकावर बुधवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित मंगेश रामचंद्र कांबळे (वय २९, रा. शाहू मिल चौक, राजारामपुरी तिसरी गल्ली) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, संशयित मंगेश कांबळे व पीडित युवती खासगी नोकरी करतात. २०१० मध्ये युवतीची त्याच्याशी ओळख झाली. त्यातून लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर आजअखेर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. युवतीने लग्नासाठी तगादा लावला असता अत्याचारावेळी तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ घेतले.

ते मित्रांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर टाकून बदनामी केली. तसेच शिवीगाळ करून मारहाणही केली. त्याच्या अत्याचाराला कंटाळून अखेर युवतीने पोलिसांत फिर्याद दिली. युवतीच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. संशयिताने त्याचा गैरफायदा घेतला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत.

 

Web Title: Torture on youth, crime against youth, pornographic videos over the app