शिरोळ संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:43 IST2021-02-06T04:43:18+5:302021-02-06T04:43:18+5:30

- ----------- मद्यपींमुळे नागरिक त्रस्त यड्राव : येथील झुडूपसदृश परिसरात व अंधाराच्या ठिकाणी मद्यपींचा वावर वाढला आहे. यामुळे या ...

Top Brief News | शिरोळ संक्षिप्त बातम्या

शिरोळ संक्षिप्त बातम्या

-

-----------

मद्यपींमुळे नागरिक त्रस्त

यड्राव : येथील झुडूपसदृश परिसरात व अंधाराच्या ठिकाणी मद्यपींचा वावर वाढला आहे. यामुळे या परिसरातून महिलांना ये-जा करणे गैरसोयीचे बनले आहे. येथील नागरिकांनी उघड्यावर मद्यपान करणाऱ्या मद्यपींना ताकीद देऊनही तसेच प्रकार सुरू असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तरी अशा मद्यपींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

-

-----------------

अब्दुललाटमध्ये मंगळवारी उपोषण

अब्दुललाट : अब्दुललाट- शिरदवाड- शिरदवाड- लाटवाडी नळ पाणीपुरवठा या संस्थेच्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी व्हावी, यासाठी अमित कांबळे यांनी अब्दुललाट येथील पाणीपुरवठा कार्यालयासमोर ९ फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. संस्थेमध्ये बेकायदेशीर कारभार होत आहे. त्यामुळे आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याचे कांबळे यांनी सांगितले. याबाबतचे निवेदन जि.प. सदस्य विजय भोजे यांच्यासह गटविकास अधिकारी यांच्याकडे दिले आहे.

-------------------

रस्ता दुरुस्त करा

जयसिंगपूर : येथील नांदणी नाका ते नांदणीकडे जाणाऱ्या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यातील खड्डे बुजवून पक्के डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

--------------------

Web Title: Top Brief News